ETV Bharat / state

'सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी रुग्णांच्या खाटांचे बघा!' - राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून 'खाटा का कुरकुरतात?' या मथळ्याखाली लिहण्यात आलेल्या अग्रलेखातून मित्रपक्षांवर टीका करण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांनी तुमची भांडण बाजूला ठेवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा, असा टोला विरोधी पक्षांनी याबाबत लगावला आहे.

bjp-mla-ram-kadam-criticized-to-maha-vikas-aghadi
'सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटांचे बघा?'
author img

By

Published : Jun 16, 2020, 3:00 PM IST

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून 'खाटा का कुरकुरतात?' या मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखातून मित्रपक्षांवर टीका करण्यात आलेली आहे. यावर विरोधी पक्षाने, सत्तेत असलेल्या पक्षांनी तुमची भांडण बाजूला ठेवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा, असा टोला लगावला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी तर, सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी रुग्णांच्या खाटांचे बघा, असे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे स्वाभिमान शिल्लक आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे.

भाजप आमदार राम कदम बोलताना...

मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रुग्णालयात खाटा मिळत नसल्यामुळे, अनेक रुग्णांना आपला जीव गमवाला लागला आहे. मात्र, या राज्यातील तीन पक्षांच्या सरकारला, आपल्या खाटांचे आणि खुर्चीचे पडलेले आहे. आज राज्यात लॉकडाऊनला ८० दिवस होऊन गेले आहेत. मात्र, एकाही गरीबाला आणि शेतकऱ्याला या सरकारने मदत केली नाही. कोमट पाणी प्या, काळजी घ्या, असे फुकटचे सल्ले राज्य सरकारने दिले असल्याचे आमदार कदम म्हणाले.

तीन पक्षांचे भांडण, याशिवाय या सरकारने जनतेला काही दिलेले नाही. आज शिवसेनेच्या मुखपत्रातून सत्तेत असलेल्या मित्रपक्षांवर म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करण्यात आलेली आहे. त्यावरून दोन्ही पक्षांकडे स्वाभिमान शिल्लक आहे की नाही? असा प्रश्न ही आमदार कदम यांनी विचारला.

सरकारकडे आमची मागणी आहे की, आता तरी गंभीर व्हा, तुमची भांडणे बाजूला राहू द्या, ज्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, त्या रुग्णांना खाटा उपलब्ध करून द्या आणि गरीबांना मदत करा, ही विनंती आम्ही तुमच्याकडे करीत आहोत, असेही राम कदम म्हणाले.

काय म्हटले आहे, 'सामना'च्या अग्रलेखात -

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, इतकेच शेवटी सांगायचे, असे आज सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा - बँक कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्या; जनता दलाची मागणी

हेही वाचा - अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना पितृशोक; अच्युत उसगांवकर यांचे गोव्यात निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.