ETV Bharat / state

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे का - दरेकर - आझाद मैदान बातमी

भाजप सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत असलेले आरक्षण दिले. मात्र, राज्यसरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकू न शकल्याचा ठपका त्यांनी ठेवला. राज्य सरकार मराठा समाजातील तरुणांच्या मगाण्यांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटले तर त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jan 24, 2021, 3:36 PM IST

Updated : Jan 24, 2021, 3:52 PM IST

मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मिळालेल्या स्थगितीमुळे विविध पदावर मराठा समाजातील नियुक्त झालेल्या मराठा समाजातील तरुणांना रुजू होता आलेले नाही. याच्या विरोधात मराठा समाजातील तरूण आझाद मैदानात गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज (24 जाने.) या तरुणांची भेट विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. आझाद मैदानावरील आंदोलनास सहा दिवस झाले असून सरकारमधील एक जणही या ठिकाणी आला नाही. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे का, असा सवाल यावेळी दरेकर यांनी उपस्थित केला.

बोलताना प्रवीण दरेकर

राज्यसरकरच्या नातर्कपणामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती ओढवली असल्याच आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. भाजप सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत असलेले आरक्षण दिले. मात्र, राज्यसरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकू न शकल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटले तर त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यसरकारला शेतकऱ्यांचा खोटा पुळका

गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांची साधी विचारपूसही राज्यसरकार कडून करण्यात आलेली नाही. मात्र त्याच आझाद मैदानात केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार सहित महाविकास आघाडीचे नेते भेट देतायत. मात्र शेतकऱ्यांचीच मुले असणाऱ्या मराठा समाजातील तरुणांनकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शतकऱ्यांचा खोटा पुळका राज्यसरकार साखवत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. शतकरी नेते शरद जोशी यांचे विचार प्रलगब करणारे हे कायदे असून केवळ राजकारण म्हणून मोर्चे काढले जात आल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

हेही वाचा - ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा; पंकजा मुंडेंनी केली मागणी

Last Updated : Jan 24, 2021, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.