मुंबई Nitesh Rane on Sanjay Raut : सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि मुंबई बॉम्ब ब्लास्टचा आरोपी सलीम कुत्ता यांचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ती पार्टी भाजपाच्या पदाधिकाऱ्यानेच आयोजित केल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणावरून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय.
तुमचे फोटो आम्ही दाखवायचे का? : नितेश राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत कुठला तरी मॉर्फ फोटो दाखवत आहेत. भाजपा पदाधिकाऱ्याचा कुठला तरी पुरावा द्यावा. बिन पुराव्याचं भुंकण्याचं काम संजय राजाराम राऊत नेहमीच करतात. आम्ही पुरावा दिला, आरोप केले आणि मग फोटो दाखवले. ती पार्टी एका भाजपा पदाधिकाऱ्याची होती असं राऊत सांगतात, पण फोटो मॉर्फ दाखवून होत नाही. एका डॉक्टर महिलासोबत असलेले तुमचे फोटो आम्ही दाखवायचे का? तुमचे आणि तिचे काय संबंध आहेत, याबद्दल वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करायचा का? असा इशाराही नितेश राणे यांनी दिलाय.
राऊत यांची झाली होती पत्रकार परिषद : सुधाकर बडगुजर प्रकरणावरून (Sudhakar Badgujar) भाजपा आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई बॉम्ब स्फोटमधील आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ हा भाजपाकडून प्रसरवण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊत यांची रविवारची सकाळची पत्रकार परिषद आहे.
बडगुजरांच्या मागचा गॉड फादर कोण? : बडगुजरांना अजून खड्ड्यात टाकण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय. आतापर्यंत बडगुजर म्हणत होते, मी त्या सलीम कुत्ताला ओळखत नाही, मी त्या पार्टीत गेलोच नाही. ते फोटो मॉर्फ आहेत. पण शनिवारी रात्री तर संजय राऊत यांनी सांगून टाकले की, तो एक अपघात होता. मॉर्फ फोटो दाखवण्याअगोदर बडगुजरांच्या मागचा गॉड फादर कोण? हे रविवारच्या पत्रकार परिषदेतून दाखवून दिलं आहे, असंही नितेश राणे यांनी सांगितलं.
वरील सर्व आरोप हे भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेले आहेत. या आरोपांची सत्यता 'ईटीव्ही भारत' करत नाही.
हेही वाचा -