मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमी लसीचा पुरवठा होण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनवर निशाणा साधला.
नौटंकी करायची होती -
पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती. जगातील अनेक देश लसीसाठी कंपन्यांना आगाऊ रक्कम देत असताना पालिका जाणीवपूर्वक ही रक्कम न देण्याचा हट्ट धरून बसली. कारण एकच त्यांना पैसा टाकायचा नव्हता लसी घ्यायच्या नव्हत्या. फक्त नौटंकी करायची होती’, असा टोला भातखळकर यांनी लगावला.
हेही वाचा - मुंबई महापालिकेमधील ग्लोबल टेंडरचा घोटाळा आम्ही उधळून लावला - किरीट सोमैय्या
केंद्राने 45 वर्षांवरील वयोगटासाठी दिलेल्या लशीतून सेलिब्रेटी आणि जवळच्या लोकांची सोय करणाऱ्या ठाकरे सरकारला आणि त्यांची सत्ता असलेल्या पालिकेला ग्लोबल टेंडरची केवळ धूळफेक करायची होती. हे जनतेच्याही आता लक्षात आले आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली.