मुंबई - कोरोनाच्या संकटकाळातही तुम्हांला १२ आमदारांची काळजी लागली आहे. शिवाय भूत आणि भुताटकीची वक्तव्य करून तुम्ही काय साध्य करत आहात, तुमचे १२ वाजले असतील, भाजपाने एक डाव भुताचा टाकला तर भारी पडेल, असे म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यपालांनी १२ आमदारांच्या फाइलवर सही करावी, आम्ही पेढे वाटू पण आमदारांच्या नावांची फाइल भुताने गायब केली आहे बहुदा, राज्यपाल आपल्या पदानुसार वर्तणूक करत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत, आमदारांच्या फाइलवर सही करायची नाही, असा वरुन आदेश असल्याचे राज्यपालांनी आपल्याला खासगीत सांगितले होते, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद उफाळला आहे.
'कोरोनाकाळातही राजकारणावर लक्ष'
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणुकीचे काम केले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार, आज कोरोनाच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचे केवळ राजकारणावर लक्ष आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना शेलार यांनी लक्ष्य केले आहे
हेही वाचा-'राज्यपाल फाईलवर सही करतील तेव्हा संपूर्ण राज्यभवनाला पेढे वाटू'