मुंबई - महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला आहे. उद्या आम्ही राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. तसेच 31 डिसेंबरपूर्वी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवडही होईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी मुनगंटीवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
चंद्रकात पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवले नाही. सरकार आमचेच येईल, यात कसलीही शंका नाही. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पाऊल हे महायुतीचे सरकार यावे, यासाठीच पुढे जात आहे, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.