मुंबई-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केल्यामुळे कोरोनाचा मुकाबला करत असलेल्या ठाकरे सरकारसमोर नवा वाद उभा राहिला आहे. लॉकडाऊन असताना उद्योगपती कपिल वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यास परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही परवानगी ज्याने दिली त्याच्यावर कारवाई करावी मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यातच हे घडलंय त्यामुळे नैतिक जबाबदारी घेत स्वतः गृहमंत्री यांनी राजीनामा दयावा, अशी मागणी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी केली आहे.
पाचगणी पोलिसांनी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही घटना समोर आली. याप्रकरणी विरोधी पक्षातील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कुणाच्या आशिर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेले? ज्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलं त्याला सक्तीच्या रजा दिली आहे. पत्र अधिकाऱ्यांनी स्वत: दिले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर मंत्र्यांचा आदेशानुसार जर झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी असे म्हणत सरकारने याबाबत खुलासा करावा आणि जबाबदारी म्हणून गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी केली आहे.
बँक घोटाळ्यातील आरोपीसह २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी सरकारची व्हीआयपी सेवा आणि सर्वसामान्यांसाठी संचारबंदी कायदा हे तर मोठ्यांचे चोचले! व्वा,अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली. त्या अधिकाऱ्यांनी स्वतः की कुणाच्या आदेशाने पत्र दिले याची चौकशी व्ह्याला हवी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री राजीनामा द्या अशी मागणी भाजपने केली आहे.