ETV Bharat / state

19 Bungalow Scam: उद्धव ठाकरे परिवाराच्या १९ बंगले घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल-किरीट सोमैय्या - रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवाराविरोधात कोलई रेवदंडा पोलीस स्टेशन, रायगड येथे १९ बंगले घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.

BJP leader Kirit Somaiya
किरीट सोमैया, भाजप नेते
author img

By

Published : Feb 24, 2023, 11:35 AM IST

Updated : Feb 24, 2023, 1:11 PM IST

प्रतिक्रिया देताना किरीट सोमैया, भाजप नेते

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंदर्भात गुरूवारी रात्री उशिरा कोलई, रेवदंडा पोलीस स्टेशन, रायगडमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती भाजप नेते सोमैय्या यांनी दिली आहे. किरीट सोमैय्या हे सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत. त्यांना आता यामध्ये यश आल्याचे दिसून येत आहे. 1 जानेवारीला 19 बंगल्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल पत्रकार परिषदेत विचारला होता.

अखेर गुन्हा दाखल : याविषयी बोलताना किरीट सोमैय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे परिवाराचा १९ बंगले घोटाळ्यासंदर्भात कोलई येथील रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक, संगनमत करून १९ बंगल्यासंदर्भात रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, चीटिंग करणे या प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आता उद्धव ठाकरेंना हिशेब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमैय्या म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण ? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगले प्रकरण किरीट सोमैय्या यांनी सातत्याने लावून धरले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हे बंगले अनधिकृत असल्याचा दावा ते सातत्याने करत आले होते. परंतु उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी या आरोपांचा इन्कार करत या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर १९ बंगल्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला. हा तपास पुन्हा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे तसेच वायकर कुटुंबीयांनी कोलईमध्ये १९ बंगल्याचा घोटाळा करताना तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व झेडपी सीईओ किरण पाटील यांनी या घोटाळ्यात त्यांना सहकार्य केल्याचेही म्हटले होते. तेव्हा ठाकरे आणि वायकर कुटुंब परिवारांबरोबर या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सुद्धा किरीट सोमैय्या यांनी केली होती.

हेही वाचा : Sanjay Bhoir News: जीएसटी घोटाळ्यात माजी नगरसेवक संजय भोईर यांना अटक; ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

Last Updated : Feb 24, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.