मुंबई - कोविड 2019 मध्ये राज्यातील अनेक रुग्णालयांना कोविड सेंटर चालवण्यात देण्यात आले होते. मात्र सुजित पाटकर लाईफ लाईन सेंटरमध्ये घाटाळा झाला होता. यांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले यामध्ये ते दोषी आढळल्यानंतर त्यांना काळ्या यादी टाकण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांना अठरा ठिकाणी कोविड सेंटर देण्यात आले होते. त्यावर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे : सुजित पाटकर यांच्या शंभर कोटीच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी पीएमआरडीएने त्यांना कसे कंत्राट मंजूर केले? महापालिकेने त्यांना कशी कामे दिली? यासंदर्भात मुंबई आर्थिक गुन्हा शाखेने चौकशी करावी. तसेच इडीने देखील या संदर्भात चौकशी करावी, अशी आपण विनंती केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
100 कोटींचा घोटाळा : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला होता. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करण्यात आले होते. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.
चौकशीची मागणी : कोरोना काळात १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी महविकास आघाडीवर केला होता. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी कोविड सेंटर चुकीच्या मार्गाने मिळवले असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. या बाबत झालेल्या चौकशीचा अहवाल महानगर पालिकेकडून आला आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधीर धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही यामध्ये कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सहआयुक्त सुधीर धामणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्यांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
कागदपत्रे देखील खोटी : कोविड सेंटरचे काम मिळावे यासाठी सुधीर पाटकर यांनी सादर केलेली कागदपत्रे देखील खोटी असल्याचा आज नवा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच एकाच स्टँम्प पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली. या प्रकरणी महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मुंबई महापालिकेने तातडीने पोलिसात तक्रार करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. आज मुलुंड येथे आपल्या निवस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला आहे.
हेही वाचा - Dharavi Rehabilitation Project : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी रेल्वेची 45 एकर जागा घेणार