मुंबई - 2000 वर्ष जुन्या महाकाली गुफेला जाणाऱ्या रस्त्याचा सुमारे कोट्यवधी रुपयांचा टीडीआर आता अविनाश भोसले आणि शाहीद बलवा यांच्या कंपनीला देण्याचे मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने बालवा आणि भोसले यांच्या कंपनीला हे नवीन वर्षाचे गिफ्ट मिळेल असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्रात मंदिरे विकली आणि गायब झाली तर नवल वाटायला नको. महाराष्ट्रात गुंफा विकण्याचे व खरेदी करण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने 100हून अधिक वर्ष जुन्या महाकाली गुफांमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा 73 कोटींचा टीडीआर मुंबई महानगरपालिका आणि ठाकर सरकारने शाहिद बालवा आणि अविनाश भोसले यांच्या महाल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. इंग्रजांनी महाकाली गुफेजवळ सुमारे 1 लाख स्क्वेअर मीटर म्हणजेच 10 लाख स्क्वेअर फूट व्यारवली गावातील जागा 999 वर्षांसाठी लिजवर दिली व 1 ऑगस्ट 1805 पासून ही लीज अस्तित्वात आहे. 1909 मध्ये भारत सरकारने या गुफेला प्रोटेक्टेट मोन्यूमेंटो घोषित केले, अशी माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर चक्र उलट्या दिशेने फिरायला लागली. 7 ऑक्टोबर 2020 रोजी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी एक पत्र लिहिले. त्या पत्राच्या आधारे ठाकरे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने टीडीआर फाईल पुनर्जीवित केली, असेही सोमय्या म्हणाले. उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना हायकोर्टाने बिल्डरची मागणी मान्य केलेली नसताना महापालिकेने मॅनिप्युलेटेड पद्धतीने कायदेशीर सल्ला घेण्याचे ठरवले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.