ETV Bharat / state

Suresh Khade on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीविरोधात आगामी निवडणुकांमध्ये आमचाच विजय होणार-सुरेश खाडे - माजी मंत्री सुरेश खाडे विधानसभा लोकसभा निवडणूक

राज्यात आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांबाबत सर्वच पक्ष आम्ही जिंकू असा दावा करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढू अथवा वेगवेगळे लढो, आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. राज्यात आम्हीच जिंकणार आणि सत्तेवर येणार असा दावा राज्याचे कामगार मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश खाडे यांनी केला आहे.

Suresh Khade on Maha Vikas Aghadi
आगामी निवडणुकांमध्ये आमचाच विजय होणार
author img

By

Published : May 25, 2023, 4:01 PM IST

Updated : May 25, 2023, 5:26 PM IST

राज्यात पुन्हा सत्ता येईल का, मंत्री सुरेश खाडे यांनी दिले उत्तर

मुंबई : राज्यात आगामी निवडणुका लढवण्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार याबाबत अंदाज घेतला जात आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या छोटा भाऊ व मोठा भाऊ असा वाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच जागा वाटपांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याबाबत चर्चा सुरू आहेत. या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री आणि भाजपचे नेते सुरेश खाडे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करू शकते. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना अडचण निर्माण होईल.

आम्ही तयार, आम्हीच जिंकणार - पुढे बोलताना सुरेश खाडे पुढे म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढू दे अथवा वेगवेगळ्या निवडणुका लढू दे.

तिसरी आघाडी कागदावरच- देशभरामध्ये तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेबाबत विरोधी पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केला आहे. केजरीवाल हे मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत आहेत, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खाडे म्हणाले की, तिसरी आघाडी तयार करण्याबाबतचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न झाले आहेत. मात्र हे काहीही होणार नाही. कोणी कितीही एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी कुणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला हरवू शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येण्याची आणि भाजपला हरवण्याची स्वप्न पाहू नये असेही खाडे म्हणाले.

तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकत्रपणे निवडणुका लढवणार असेच गृहीत धरून आम्ही तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनी कशाही निवडणुका लढवल्या तरी आगामी निवडणुकांमध्ये आमचाच विजय होणार आहे. राज्यात एक हाती सत्ता आणण्यात यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे-मंत्री सुरेश खाडे

महाविकास आघाडी टिकणार- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच ही महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी, भाजप व ठाकरे गटाची एकत्रित आघाडी राहणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. महाविकास आघाडी टिकणार असल्याचे स्टॅम्प ड्युटीवर लिहून देण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी फिल्डींग, नेतृत्वाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी
  2. MVA on BMC Election : बीएमसी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा मोठा दावा; थेटच सांगितले...
  3. Ajit Pawar On MahaVikas Aghadi : महाविकास आघाडी कायम एकत्र असणार - अजित पवार

Last Updated : May 25, 2023, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.