मुंबई: याप्रसंगी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या आहेत की, उद्धवराव तुम्ही व तुमचा बोलका पोपट म्हणजे सर्वज्ञानी रडता संजय राऊत. झोप आणि झोपेच्या सोंगा संदर्भात तुमचं ज्ञान हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. जेव्हा महाराष्ट्राला एका ॲक्टिव मुख्यमंत्र्यांची गरज होती, तेव्हा तुम्ही घरी घोरत झोपला होतात. झोपेचं सोंग घेऊन कोविड घोटाले केले व करवलेत, हे सर्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आता राहिला प्रश्न आमच्या देवेंद्रजींचा. मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर जाण्याचा तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस हे पहिले गैर काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी आपला पाच वर्षांचा संपूर्ण कार्यकाल यशस्वीपणे पार पाडला. पदाची कुठलीही अपेक्षा न करता लोकांच्या सेवेमध्ये झोकून देणारे असे आमचे देवेंद्रजी आहेत. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत असा त्यांचा आलेख आहे.
वडिलांची पुण्याई व तुमचं लांगुलचालन: चित्रा वाघ पुढे म्हणाल्या आहेत की, उद्धवजी तुम्ही साधी महानगरपालिकेची निवडणूकही लढवली नाहीत. अशातही तुम्ही मुख्यमंत्री झालात. अर्थात यामध्ये सुद्धा तुमच्या वडिलांची पुण्याई व तुमचं लांगुलचालन अशात तुमचं कर्तृत्व काय. तुमची अवस्था काय? तुमची अवस्था तर तेलही गेलं, तूपही गेलं हाती राहिलं धुपाटन अशी झाली आहे. मुख्यमंत्री पद सोडाच पण तुमच्या वडिलांनी जी माणसं जमवली ती सुद्धा तुम्हाला टिकवता आली नाहीत. तुमच्या पक्षाचे नाव तुम्हाला टिकवता आलं नाही. तुमच्या पक्षाचे चिन्हही तुम्हाला टिकवता आलं नाही. त्यामुळे देवेंद्रजी पुन्हा सत्तेत आल्यामुळे या सर्वातून होणारी तुमची जळजळ आम्ही समजू शकतो आणि या जळजळीतून तुम्हाला होणारा त्रास आम्ही समजू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला पाठवते आहे यावरचा रामबाण उपाय बर्नोल.. मला नक्की विश्वास आहे, या बर्नोलने तुम्हाला नक्की आराम पडेल. कृपया लावून घ्या.
'सामना' वृत्तपत्राची होळी: शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या 'सामना' मधून आज भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी 'सामना' वृत्तपत्राची होळी करत आंदोलन केले आहे.
हेही वाचा: