ETV Bharat / state

"एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' मिळाला की 'यु टर्न' घेण्यास मोकळे", आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा - Ashish Shelar Uddhav Thackeray

Ashish Shelar : मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना 'यु टर्न फेम' म्हणत चिमटा काढला.

Ashish Shelar
Ashish Shelar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 10:23 PM IST

मुंबई Ashish Shelar : धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज (१६ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावीत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावरून आता मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) त्यांना मिळाला की 'यु टर्न' घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीका केली.

उध्दव ठाकरे म्हणजे यु-टर्न : आशिष शेलार म्हणाले की, "उबाठा नेहमीच विकासाच्या विरोधात काम करतं. प्रकल्प अडवून कटकमिशन वसूली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कटकमिशन साठी संघर्ष करत आहेत. यांच्या सरकारच्या काळातच धारावीच्या पुनर्विकासाचं टेंडर निघालं. उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यु-टर्न. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्यातून प्रत्येक वेळी यु-टर्न घेतले आहेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करण्याची भूमिका घेतली. 'यु टर्न फेम' उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तो ही 'टी जंक्शन' वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच", असा चिमटा आशिष शेलारांनी घेतला.

ठाकरे डिमांड रुपया : आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, "एकदा त्यांना 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) मिळाला की 'यु टर्न' घेण्याचा मार्ग मोकळा. आज ते म्हणाले, मी घेतलेला एखादा बिल्डर धार्जिणा निर्णय दाखवा. कोविडमध्ये बिल्डरांना १२ हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला?", असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला. "यांना धारावीकरांचा पुळका जोरात, खोके घेऊन आता अदानी कधी जाणार मातोश्रीच्या दारात?" असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

हे वाचलंत का :

  1. "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.