ETV Bharat / state

Ashish Shelar : केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणाचे वसूलीचे षडयंत्र - आशिष शेलार

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी ( Saurabh Tripathi Case ) यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होते आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते, आमदार ॲड. आशिष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) यांनी केली असता गृहमंत्र्यांनी ती मान्य करीत चौकशीची घोषणा केली. याबाबतची माहिती आशिष शेलार यांनी विधान भवन ( Ashish Shelar in Vidhanbhavan ) परिसरामध्ये प्रसारमाध्यमांना दिली.

bjp leader ashish shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Mar 23, 2022, 1:48 PM IST

मुंबई - केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी ( Saurabh Tripathi Case ) यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होते आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते, आमदार ॲड. आशिष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) यांनी केली असता गृहमंत्र्यांनी ती मान्य करीत चौकशीची घोषणा केली. याबाबतची माहिती आशिष शेलार यांनी विधान भवन ( Ashish Shelar in Vidhanbhavan ) परिसरामध्ये प्रसारमाध्यमांना दिली.

त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? -

राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

हेही वाचा - phone tapping case : रश्मी शुक्ला जवाब नोंदवण्यासाठी दुसऱ्यांदा पोलीस स्टेशनमधे पोचल्या

जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रद्रोह -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली. मात्र, ही कारवाई भारतीय जनता पक्षाकडून केवळ महाविकास आघाडी वर सूड उगवण्यासाठी केली असल्याची टीका सर्वच आघाडीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी केली. तसेच सध्या राज्यामध्ये घडामोडी पाहता आपल्या मुलीला महाराष्ट्र ठेवणार नाही, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. मात्र, त्यांनी केलेलं हे वक्तव्य महाराष्ट्र ग्रह असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने महाराष्ट्राबद्दल असं वक्तव्य करत असेल, महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे, असा प्रचार करत असतील तर, तो महाराष्ट्र द्रोह हा नाही तर काय आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.