ETV Bharat / state

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांच्यासारख्या चांगल्या नेत्यांवर भाजपचा डोळा; थोरातांसमोर फडणवीसांची फटकेबाजी - dy cm devendra fadanvis reaction

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांनी विदेशात उच्च शिक्षणही घेतल आहे. सर्व प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ते राजकारणात सक्रिय झाले, तर त्याचा फायदा महाराष्ट्रासह देशाला होईल. मात्र काँग्रेस अद्यापही त्यांना संधी देत नाही. त्यामुळे काँग्रेसने जर संधी दिली नाही तर, सत्यजित तांबे यांच्यावर भारतीय जनता पक्षाचा देखील डोळा आहे.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe
author img

By

Published : Dec 8, 2022, 9:38 AM IST

मुंबई: काँग्रेस नेते सत्यजित तांबे Congress leader Satyajit Tambe यांच्यावर भारतीय जनता पक्षाचा डोळा आहे, असे भर मंचात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी सिटीजनविली या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केल आहे. या पुस्तकाचं यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सायंकाळी प्रकाशन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, प्रवीण दरेकर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, हे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचा देखील डोळा: सत्यजित तांबे यांनी विदेशात उच्च शिक्षणही घेतल आहे. सर्व प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ते राजकारणात सक्रिय झाले, तर त्याचा फायदा महाराष्ट्रासह देशाला होईल. मात्र काँग्रेस अद्यापही त्यांना संधी देत नाही. त्यामुळे काँग्रेसने जर संधी दिली नाही तर, सत्यजित तांबे यांच्यावर भारतीय जनता पक्षाचा देखील डोळा आहे. अशी मुश्किल टिप्पणी आपल्या भाषणातून या कार्यक्रमाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कॅलिफोर्नियाचे मेयर गॅविन न्युसम यांनी हे पुस्तक लिहिलं: सत्यजित तांबे यांनी अनुवाद केलेलं सिटी ते मिली हे पुस्तक फक्त सामान्य नागरिकांसाठीच नाही, तर राजकारणासाठी देखील तेवढेच महत्त्वाचा आहे. कॅलिफोर्नियाचे मेयर गॅविन न्युसम यांनी हे पुस्तक लिहिलं असून या पुस्तकातून शहरीकरण किती महत्त्वाचा आहे. आणि त्या शहरीकरणात केवळ नेतेच नाही, तर सामान्य नागरिकांचाही सहभाग कशाप्रकारे असला पाहिजे. अगदी बालक आणि हृदय कशाप्रकारे यामध्ये योगदान देऊ शकतात. याचे महत्त्व या पुस्तकातून सांगण्यात आला आहे.

हे पुस्तक चांगलं मार्गदर्शन करू शकेल: महाराष्ट्रातही उत्तम शहर तयार झाली पाहिजेत. देशामध्ये सध्या शहरीकरणाकडे मोठा कल आहे. ग्रामीण भागातून नोकऱ्यांसाठी आपला सन्मान मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात शहरात येत आहे. त्यामुळे शहराच्या लगत एक नवीन शहर तयार होत आहेत. ती शहर अत्यंत उत्तम आणि सुविधा पूर्ण असावीत आणि तशी शहर कशी तयार करता येतील. याबाबत हे पुस्तक चांगलं मार्गदर्शन करू शकेल, असे भाषण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण: मात्र राज्यातलं एक चांगलं युवा नेतृत्व पुढे यावं, या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनीही निष्क्रिय टिप्पणी केली आहे. राजकारणात युवा नेतृत्वाला संधी मिळावे, असे सर्वांनाच वाटते म्हणून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहेत, असे स्पष्टीकरण कार्यक्रमानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तसेच काँग्रेसचे पक्ष नेतृत्व आपल्याला लवकरच सक्रिय राजकारणात संधी देईल. आपल्याकडे श्रद्धा आणि सबुरी असे दोन्हीही असल्याचे यावेळी सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.