ETV Bharat / state

'खर्चाचा हिशेब का देत नाही?, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?'

author img

By

Published : Dec 31, 2020, 3:09 PM IST

सत्ताधारी शिवसेनेने यावर मतदान घेत चारशे कोटी खर्चाला मंजुरी दिली. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज जोरदार टीका केली आहे.

'खर्चाचा हिशेब का देत नाही?, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?'
'खर्चाचा हिशेब का देत नाही?, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?'

मुंबई - काल महापालिका स्थायी समितीमध्ये शिवसेनेने जबरदस्तीने सत्तेचा वापर करत अजून चारशे कोटी खर्च करण्यासाठी मंजुरी मिळवली, असा आरोप भाजपाने करत, यावर भाजपचा विरोध असतानाही मंजुरी मिळाल्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार कोविड काळात झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाहीत?, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळले नाही. यासाठी मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याची विनंती काल स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना सत्ताधाऱ्यांनी केली. मात्र, आतापर्यंतच्या खर्चाचा हिशेब येईपर्यंत हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्याची उपसूचना भाजपाने मांडली. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने यावर मतदान घेत चारशे कोटी खर्चाला मंजुरी दिली. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज जोरदार टीका केली आहे.

पर्यावरणप्रेमी वरळीला किती गेले?

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च तर अजून 400 कोटी हवे असे पालिका म्हणते पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरणप्रेमी वरळीला किती गेले? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करून भरले -

चारशे कोटी रुपये मागणीच्या प्रस्तावाला परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली. ती शिवसेनेने नामंजूर का केली? का लपवाछपवी करता? हिशेब द्या! मुंबईकर कोरोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करून भरले, असे शेलार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.