मुंबई - भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अन्य पक्षातील आमदार फुटतील चिंता करू नका. स्वतःचा पक्ष आणि सरकार वाचवण्याची भूमिका घ्या, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशा प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे भाजप आमदार फुटणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीतील नाराज आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे अनेक वेळा भाजपाने म्हटले आहे. ऑपरेशन कमळ राजकीय वर्तुळात वेळोवेळी चर्चा पाहायला मिळते. त्यातच आता भाजपातील नाराज आमदारांचा गट महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. जे लोक राष्ट्रवादीसोडून गेले होते ते पुन्हा शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीनेही प्लॅन बी तयार केला आहे. भाजपाचे जे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात येत आहे.
यावर भाजप नेते असे शेलार यांनी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या घरातला विसंवाद आणि स्वतःच्या घरातला भेद लपवण्यासाठी, भारतीय जनता पक्षातील काही आमदार येथील अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात काम राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीपक्षांमध्ये योजनाबदल चाललेला आहे. याला कुठलाही पद्धतीची सफलता मिळण्याची शक्यता भाजप कडून दुरान्वये नाही. स्वतःचा पक्ष ववाचवण्यासाठी आणि अपयशातून मार्ग काढण्यासाठी बातम्या पसरवल्या जात आहेत. याचा आम्हाला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रियाही शेलार यांनी दिली.
जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षात संवाद जरी साधला तरी खूप होईल. अन्य पक्षातील आमदारांची चिंता तुम्ही करू नका. स्वतः सरकार आणि स्वतःचा पक्ष वाचवण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे, असा टोला शेलार यांनी लगावला. भारतीय जनता पक्षाला कोणाचाही परिवार फोडण्याची इच्छा नाही आणि कोणत्याही पद्धतीने सरकार पाडण्याची इच्छा नाही, या शब्दांमध्ये शेलार यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.