मुंबई - गेल्या 7 वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आहे. मोदी सरकार ( Modi Government ) सत्तेत आल्यापासूनच समाजा-समाजात आणि धर्म-धर्मामध्ये फूट पाडण्याचे काम केल जात असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसकडून केला जातोय. भारतीय जनता पक्षाचे जाती-धर्म बाबतचे मनसुबे उधळून लावायचे आसतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणाऱ्या काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र या, असे आवाहन काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक विभागाच्या आढावा बैठकीत ( Congress Minority Section Review Meeting ) करण्यात आले.
दादर येथील टिळक भवन ( Tilak Bhavan Dadar ) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाची आज बैठक पार पडली. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तसेच काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी च्या कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, मुंबईचे पालकमंत्री असलम शेखआणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापरुडी हे उपस्थित होते.
नानांचा भारतीय जनता पक्षावर निशाणा - धर्मात आणि जातींमध्ये फूट पाडून देशावर राज्य करण्याची नीती भारतीय जनता पक्षाची आहे. गेल्या 7 वर्षापासून विविध जाती-धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम भाजपकडून करण्यात येते. अनेक वर्षापासून सर्व जाती-धर्माचे लोक देशात गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, मोदी सरकार आल्यामुळे देशात वातावरण खराब झाली असल्याची टीका या आढावा बैठकीत नाना पटोले यांनी केली. तसेच समाजात विष पेरण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप इमरान प्रतापरुडी यांच्याकडून भाजपवर करण्यात आला आहे.