मुंबई - नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची तयारी शहरात काही जणांकडून सुरू होती. यासह काही आक्षेपार्ह विधानेही केली जात असल्याची माहिती पोलिसांना देणाऱ्या एका टॅक्सी चालकाचा भाजपच्या वतीन सन्मान करण्यात आला.
रोहित गौर, त्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या आवारातच गौर याचा अलर्ट सिटीझन अर्थात जागरूक नागरिक सन्मान देऊन गौरव केला.
हेही वाचा - ...त्यांनी पाच वर्षात 'शिक्षणाच्या आयचा 'घो' केला - संजय राऊत
मुंबईतही शाहीन बाग प्रमाणेच मोठे आंदोलन करण्याची तयारी करण्याचा उद्देश त्या प्रवाशांचा होता असेही गौर याचे म्हणणे आहे. रेकॉर्ड केलेले संभाषण गौर याने सांताक्रुज पोलिसांना दिले असून पुढील चौकशी सुरू आहे. एकंदरीत सुधारित नागरिकत्व कायद्याला काही घटक विरोध करता असतानाच भाजप कार्यकर्तेही अनेकदा या कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आता या कायद्याला विरोध करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या टॅक्सी चालकाचा सन्मान करत देशातल्या नागरिकांनीही जागरूक राहून विरोधातील आंदोलन मोडून काढावे, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केलेे आहे.
हेही वाचा - 'मागच्या ५ वर्षात शिक्षणात विष पेरण्याचा प्रयत्न'