ETV Bharat / state

विरोधी पक्षनेते पदासाठीही भाजपला करावी लागणार प्रतीक्षा! - भाजपचे मुंबई महानगरपालिका स्थान

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाली. भाजपने त्यावेळी सेनेसाठी मतदान केल्यामुळे शिवसेनेचा महापौर बनला. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात होते. मात्र, भाजपने आपण विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jan 22, 2020, 11:29 PM IST

मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपने आपण महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार असल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत काँग्रेस या पदावरून आपला दावा सोडत नाही तोपर्यंत भाजपला विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठीही भाजपला करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाली. त्यावेळी २२७ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे ८५, भाजपचे ८२, काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादी पक्षाचे ६, एमआयएमचे २, अखिल भारतीय सेनेचा १ आणि इतर अपक्ष नगरसेवक निवडून आले. भाजपने त्यावेळी सेनेसाठी मतदान केल्यामुळे शिवसेनेचा महापौर बनला. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात होते. मात्र, भाजपने आपण विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तिसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजेच काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले.

हेही वाचा - राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षांना एकत्र करून महाविकास आघाडी स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यामुळे भाजपने आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप नगरसेवक आणि आमदारांच्या बैठकीत मुंबई पालिकेत विरोधी बाकांवर बसण्याचा तसेच विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार, असे वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी केले आहे.

आत्ता का मिळणार नाही भाजपला विरोधी पक्ष नेते पद -
भाजपकडून विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपला आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. पालिकेच्या नियमानुसार एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद दिले असल्यास तो पक्ष जोपर्यंत विरोधी पक्ष नेते पदावरील आपला दावा सोडत नाही तोपर्यंत इतर पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. या नियमानुसार काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा विरोधी पक्षनेतेपदावरून दावा सोडावा लागेल. मात्र, सध्या तरी काँग्रेसची तशी भूमिका नाही.

२०१७ मध्ये भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही, आम्ही पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे सांगितले होते. भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला नसल्याने मला विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. आता भाजप विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे सांगत आहे. मी सध्या या पदावर आहे. मला पदावरून काढून भाजपचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही. आमच्या काँग्रेस पक्षाने पालिकेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तरच भाजपला हे पद मिळू शकते, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले आहे.

भाजपने दोन वर्षांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपद नाकारले आहे. त्यांना मनात येते तेव्हा ते सत्तेच्या बाजूने असतात, तर कधी विरोधात जातात. भाजपने गेल्या दोन वर्षात मुंबईकरांचे कोणतेही प्रश्न पालिकेत मांडलेले नाहीत. भाजप पालिकेत पूर्णपणे अपयशी ठरली असल्याने त्यांना विरोधी पक्ष नेते पद देणे चुकीचे ठरेल, असे समाजवादी पक्षाचे आमदार आणि गटनेते रईस शेख यांनी म्हटले आहे.

Intro:भाजपासाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते पद दूरच
- काँग्रेस पदावरून दावा सोडे पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

बातमीसाठी pkg Body:Pkg Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.