ETV Bharat / state

पहारेकऱ्याची भूमिका चोख बजावल्याने भाजपने घेतला अभिजित सामंत यांचा राजीनामा - politics

पालिकेच्या स्थायी, सुधार, विधी समिती तसेच वृक्ष प्राधिकरण समितीत पहारेकऱ्याची भूमिका चोख बजावल्याचे बक्षीस म्हणून भाजपने अभिजित सामंत यांच्याकडून स्थायी तसेच विधी समितीचा राजीनामा मागून घेतला आहे.

अभिजित सामंत
author img

By

Published : Aug 30, 2019, 5:24 AM IST

मुंबई - पालिकेच्या स्थायी, सुधार, विधी समिती तसेच वृक्ष प्राधिकरण समितीत पहारेकऱ्याची भूमिका चोख बजावल्याचे बक्षीस म्हणून भाजपने अभिजित सामंत यांच्याकडून स्थायी तसेच विधी समितीचा राजीनामा मागून घेतला आहे. दरम्यान सध्याचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक यांना सामंत डोईजड होणार या भीतीनेच सामंत यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे.

राज्यात आणि केंद्रात शिवसेना आणि भाजपची युती आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून भाजप सत्तेत सहभागी न होता पहारेकऱ्याची भूमिका बजावत आहे. पहारेकऱ्याची भूमिका बजावताना सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवकांनी अनेक वेळा कोंडीत पकडले आहे. यात भाजपचे गटनेते मनोज कोटक, प्रभाकर शिंदे व अभिजित सामंत यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत आर्थिक प्रस्ताव मंजूर केले जातात. या समितीत येणारे अनेक प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सामंत यांनी निदर्शनास आणून दिले होते. या समितीत मंजूर होणाऱ्या प्रस्तावामागे आर्थिक गणित असल्याने सामंत हे अनेकांना डोईजड झाले होते. सामंत यांच्या अभ्यासू वृत्ती आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाला त्यांची दखल घ्यावी लागत होती.

प्रभाकर शिंदे हे शिवसेनेतून भाजपमध्येआले असल्याने तर अतुल शाह यांचा पालिकेबाबत अभ्यास नसल्याने भाजपचे भावी गटनेते म्हणून सामंत यांच्याकडे पाहिले जात होते. भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाल्याने त्यांचे पालिकेकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र कोटक यांनी पुन्हा पालिकेकडे लक्ष देण्यास सुरूवात केल्यावर सामंत आपल्याला डोईजड ठरतील म्हणून त्यांच्याकडून स्थायी व विधी समितीचा राजीनामा मागून घेतला आहे.

पालिकेत मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव गेली २ वर्षे रखडला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांची नेमणूक केल्यावर हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आला होता. भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार बनून दिल्लीला गेल्यावर समिती व मिडियामध्ये सामंत यांनी भाजपची भूमिका योग्य प्रकारे मांडली होती. यातच गुरुवारी (२९ ऑगस्टला) वृक्ष प्राधिकरण समितीत मेट्रो कारशेडसाठी २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर होताच सामंत यांचा राजीनामा घेण्यात आल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Intro:मुंबई - पालिकेच्या स्थायी, सुधार, विधी समिती तसेच वृक्ष प्राधिकरण समितीत पहारेकऱ्याची भूमिका चोख बजावल्याची बक्षिसी म्हणून भाजपाने अभिजित सामंत यांच्याकडून स्थायी तसेच विधी समितीचा राजीनामा मागून घेतला आहे. दरम्यान सध्याचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक यांना सामंत डोईजड होणार या भीतीनेच सामंत यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. Body:राज्यात आणि केंद्रात शिवसेना आणि भाजपाची युती आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून भाजपा सत्तेत सहभागी न होता पहारेकऱ्याची भूमिका बजावत आहे. पहारेकऱ्याची भूमिका बजावताना सत्ताधारी शिवसेनेला भाजपा नगरसेवकांनी अनेक वेळा कोंडीत पकडले आहे. यात भाजपाचे गटनेते मनोज कोटक, प्रभाकर शिंदे व अभिजित सामंत यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत आर्थिक प्रस्ताव मंजूर केले जातात. या समितीत येणारे अनेक प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सामंत यांनी निदर्शनास आणून दिले होते. यासमितीत मंजूर होणाऱ्या प्रस्तावामागे आर्थिक गणित असल्याने सामंत हे अनेकांना डोईजड झाले होते. सामंत यांच्या अभ्यासूवृत्ती आणि मुद्देसूद मांडणी यामुळे त्यांची दखल सत्ताधारी आणि प्रशासनाला घ्यावी लागत होती.

प्रभाकर शिंदे हे शिवसेनेतून भाजपात आले असल्याने तर अतुल शाह यांचा पालिकेबाबत अभ्यास नसल्याने भाजपाचे भावी गटनेते म्हणून सामंत यांच्याकडे पाहिले जात होते. भाजपाचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाल्याने त्यांचे पालिकेकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र कोटक यांनी पुन्हा पालिकेकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्यावर आपल्याला डोईजड ठरतील अशा सामंत यांचा स्थायी व विधी समितीचा राजीनामा मागून घेतला आहे.

पालिकेत मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव गेले दोन वर्षे रखडला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांची नेमणूक केल्यावर हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आला होता. भाजपाचे गटनेते मनोज कोटक हे खासदार बनून दिल्लीला गेल्यावर समिती व मिडियामध्ये सामंत यांनी भाजपाची भूमिका योग्य प्रकारे मांडली होती. गुरुवारी (२९ ऑगस्टला) वृक्ष प्राधिकरण समितीत मेट्रो कारशेडसाठी २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर होताच सामंत यांचा राजीनामा घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे.

सोबत अभिजित सामंत यांचा फोटो.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.