ETV Bharat / state

'इंडिया आघाडी'च्या भीतीनं भाजपाला पोटदुखी - काँग्रेस

ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडी समावेश होण्याची भीती भाजपाला वाटत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) पोटात पोटशूळ उठलंय, असा आरोप, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

INDIA Aghadi
INDIA Aghadi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 9:51 PM IST

अतुल लोंढे , सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई : सध्या देशाची लोकशाही अडचणीत आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान धोक्यात आलं आहे. त्यामुळं देश पातळीवर इंडिया आघाडी स्थापन होत असून राज्यातही महाविकास आघाडी अभेद्य आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेली वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत समाविष्ट होत, असल्यानं भाजपाला त्याची धास्ती वाटत आहे. त्यामुळं काही माध्यमांनी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.

वंचित बहुजन आघाडी समाविष्ट होणार : वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. ही आघाडी लवकरच 'इंडिया आघाडीत समाविष्ट होईल, या भीतीनं भाजपाचं धाबं दणाणलंय. म्हणूनच काही लोकांमार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून धादांत खोटी माहिती पसरवली जात असल्याचं लोंढे म्हणाले. आघाडीबाबत चर्चा सुरू असताना कोणत्याही पत्रकाराला अशा बैठकीमध्ये समाविष्ट केलं जात नाही. त्यामुळं आघाडी संदर्भातील चर्चा कोणत्याही पत्रकारासमोर होण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून काहीजण जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा पद्धतीची माहिती पसरवत आहेत, असंही लोंढे म्हणाले.

सुरज चव्हाण यांचा अमोल कोल्हेंना टोला : तर, दुसरीकडं अजित पवार गटानं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोल्हें यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर आज अमोल कोल्हे यांचा शेतकऱ्यांसाठी जन आक्रोश दिसला. अनेक वर्ष त्यांच्या मतदारसंघातील लोक खासदार अमोल कोल्हे कुठं आहेत, हे शोधत होते. शेवटी त्या भागातल्या जनतेला लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं का होईना खासदाराचं दर्शन झालं. त्यांना शेतकऱ्याचा आक्रोश तीन चार वर्षांनी समजला हेच महत्त्वाचं होतं. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले की निवडणुकीच्या भीतीपोटी रस्त्यावर उतरले, हे जनता येणाऱ्या काळात त्यांना सांगेल. ज्या खासदारांनी तीन वर्ष मतदारसंघाचं तोंड बघितलं नव्हतं, त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. यातच अजित पवारांनी केलेल्या भविष्यवाणीचं भविष्य दिसून येतंय, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं सरकारची डोकेदुखी वाढणार?
  2. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; 'या' ठिकाणी एन्जॉय करा थर्टी फर्स्ट
  3. "राम मंदिराच्या उद्घाटनाला कृपया अयोध्येत येऊ नका", जाणून घ्या मोदी असं का म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.