ETV Bharat / state

हिंदी मालिकांनंतर मराठी मालिकांमधूनही भाजपचा प्रचार

हिंदी मालिकांनंतर भाजपने आता मराठी लोकप्रिय मालिकांकडे मोर्चा वळवला आहे. मराठी लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मालिकेतून 'मेक इन इंडिया' योजनेचा प्रचार ८ एप्रिलच्या प्राइम शोमधून करण्यात आला आहे. या विरोधात आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

तुला पाहते रे या मराठी मालिकेतून भाजपच्या याजनांचा प्रचार केला जात आहे.
author img

By

Published : Apr 9, 2019, 11:36 AM IST

मुंबई - निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु, यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर टीव्हीवरील मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात आहे. हा प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे.

तुला पाहते रे या मराठी मालिकेतून भाजपच्या याजनांचा प्रचार केला जाता आहे.
हिंदी मालिकांनंतर भाजपने आता मराठी लोकप्रिय मालिकांकडे मोर्चा वळवला आहे. मराठी लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मालिकेतून 'मेक इन इंडिया' योजनेचा प्रचार ८ एप्रिलच्या प्राइम शोमधून करण्यात आला आहे. या विरोधात आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपतर्फे छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील 'तुझसे हे राबता' व अॅन्ड टीव्हीवरील 'भाभीजी घर पर है' या मालिकांमधून यापूर्वी प्रचार झाला आहे. तर मराठी लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे ' मालिकेतून मेक इन इंडिया योजनेचा प्रचार करण्यात आला असल्याचे आता उघड झाले आहे.

BJP campaign from Marathi Serial
मालिकांमधून होत असलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाहिन्यांचे मालक, निर्माते आणि कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधाऱयांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. त्यामुळे या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तत्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, निर्माते आणि कलाकारांसोबतच भाजपवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल कराण्याची मागणी होत आहे.

Intro:Body:MH_EC_MarathiSerials_Compliant 9.4.19

हिंदी सिरीअल्सनंतर मराठी सिरीअल्समधूनही भाजपचा प्रचार

मुंबई:निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. हिंदि मालिकांनंतर भाजपनं आता मराठी लोकप्रिय मालिकांकडं मोर्चा वळवला आहे.
मराठी लोकप्रिय मालिका ' तुला पाहते रे ' मालिकेतून मेकइनइंडिया योजनेचा प्रचार काल ( ता.८ एप्रिलच्या) प्राइम शोमधून करण्यात आली आहे.

या विरोधात आता निवडणुक आयोगकडे तक्रार करण्यात आली आहे.
मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भारतीय जनता पक्षातर्फे छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील तुझसे हे राबता व अॅन्ड टीव्हीवरील भाभीजी घर पर है या मालिकांमधील यापूर्वी प्रचार झाला आहे. तर मराठी लोकप्रिय मालिका ' तुला पाहते रे ' मालिकेतून मेकइनइंडिया योजनेचा प्रचार करण्यात आला आल्याचे आता उघड झाले आहे.

सदर मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधा-यांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. पेड न्यूज ही देखील याच प्रकारात मोडते. त्यामुळे पेड न्यूजच्या धर्तीवर या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात तथा आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, तसेच मालिकांचे निर्माते आणि कलाकारांसोबतच भारतीय जनता पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.