ETV Bharat / state

'बीएमसी'मधील दांडीबहाद्दर नगरसेवकांना बसणार चाप; बायोमेट्रिक हजेरी सक्तीची होणार - बायोमेट्रिक

पालिका सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी घेतली जाते. विकास कामे व अनेक धोरणात्मक निर्णय येथे घेतले जातात. निर्णय घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र, अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:48 PM IST

मुंबई - महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. पालिका आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर आता नगरसेवकांना बायोमट्रिक हजेरी सक्तीची करण्याबाबतचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसेल असे बोलले जाते.

'बीएमसी'मधील दांडीबहाद्दर नगरसेवकांना बसणार चाप; बायोमेट्रिक हजेरी सक्तीची होणार

का घ्यावा लागला निर्णय -

पालिका सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी घेतली जाते. विकास कामे व अनेक धोरणात्मक निर्णय़ येथे घेतले जातात. निर्णय घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र, अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हीप काढावा लागत होता. त्यामुळे अशा उशिरा येणा-या व लवकर पळ काढणाऱया नगरसेवकांना वेसण लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती.

लवकरच अंमलबजावणी -

मनोज कोटक यांनी मांडलेल्या प्रस्तावाला गटनेत्यांनी दिड वर्षपूर्वी मंजुरी दिली होती. याप्रस्तावावर पालिका आयुक्तांचा अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनीही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. त्याबाबत पालिका आयुक्तांचा अभिप्राय आल्याने आज गटनेत्यांच्या बैठकीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंलबजावणी लवकरच केली जाईल. मात्र, गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांचे मानधन कापले जाणार का याबाबतचा निर्णय झाला नसल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.

दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप -

महापालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही वेळ बसून सभागृहाबाहेर ठेवलेल्या मस्टरवर सही केली की नगरसेवकांना दिवसभराची हजेरी लागून भत्ता लागू होतो. त्यामुळे काही नगरसेवक काही वेळ सभागृहात बसून पळ काढत होते. यामुळे महत्वाच्या प्रश्नावर आणि विकासाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना नगरसेवकांची गैरहजेरी दिसत होती. सभागृहात नगरसेवक नसल्याने एखाद्या प्रस्तावावर मतदान घेतानाही अडचणी येत होत्या. सभागृहात प्रवेश करताना व घरी जाताना हजेरी लावावी लागणार आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्याने दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे. या निर्णयामधून महापौर आणि उप महापौरांना वगळण्यात आले आहे.

Intro:मुंबई -
मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. पालिका आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर आता नगरसेवकांना बायोमट्रीक हजेरी सक्तीची करण्याबाबतचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसेल असे बोलले जाते. Body:का घ्यावा लागला निर्णय -
पालिका सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी घेतली जाते. विकास कामे व अनेक धोरणात्मक निर्णय़ येथे घेतले जातात. निर्णय़ घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हिप काढावा लागत होता. त्यामुळे अशा उशिरा य़ेणा-या व लवकर पळ काढणा-या नगरसेवकांना वेसण लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती.

लवकरच अंमलबजावणी -
मनोज कोटक यांनी मांडलेल्या प्रस्तावाला गटनेत्यांनी दिड वर्षपूर्वी मंजुरी दिली होती. याप्रस्तावावर पालिका आयुक्तांचा अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनीही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. त्याबाबत पालिका आयुक्तांचा अभिप्राय आल्याने आज गटनेत्यांच्या बैठकीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंलबजावणी लवकरच केली जाईल. मात्र गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांचे मानधन कापले जाणार का याबाबतचा निर्णय झाला नसल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.

दांडी बहाद्दर नगरसेवकांना चाप -
महापालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही वेळ बसून सभागृहाबाहेर ठेवलेल्या मस्टरवर सही केली की नगरसेवकांना दिवसभराची हजेरी लागून भत्ता लागू होतो. त्यामुळे काही नगरसेवक काही वेळ सभागृहात बसून पळ काढत होते. यामुळे महत्वाच्या प्रश्नावर आणि विकासाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना नगरसेवकांची गैरहजेरी दिसत होती. सभागृहात नगरसेवक नसल्याने एखाद्या प्रस्तावावर मतदान घेतानाही अडचणी येत होत्या. सभागृहात प्रवेश करताना व घरी जाताना हजेरी लावावी लागणार आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्याने दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे. या निर्णयामधून महापौर आणि उप महापौरांना वगळण्यात आले आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बाईट
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.