ETV Bharat / state

रेल्वे तिकीट आरक्षित नसलेल्या प्रवाशांना मिळणार बायोमेट्रिकने सीट

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे तिकीट आरक्षणासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या सर्व स्थानकांत राबवण्यात येणार आहे.

author img

By

Published : Jul 31, 2019, 9:01 PM IST

मुंबई सेंट्रल येथे तिकीट आरक्षणासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे

मुंबई - लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आता विनाआरक्षित प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनद्वारे तिकीट बुक करून सीट उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून, लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या सर्व स्थानकांत राबवण्यात येणार आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आरक्षण न केलेल्या प्रवाशांची सीट पकडताना धावपळ होत असे. यातुन अनेकदा वाद-विवादाच्या घटनाही घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या सर्वांना आळा घालण्यासाठी हा नवीन प्रयोग सुरू करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे. या बायोमेट्रिक मशीनवर प्रवाशाने अंगठा लावल्यावर विनाआरक्षित डब्यातील जागा बुक करता येते. तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तिकीट दिले जाते. त्यानंतर रांगेने तिकीट दाखवूनच प्रवाशांना गाडीत सोडले जाते. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रवासी वर्गाने या प्रणाली बाबत समाधान व्यक्त केला आहे.

Intro:लांब पल्ल्यांच्या गाड्यात आता विना आरक्षित प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनद्वारे तिकीट बुक करून सीट उपलब्ध होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असूनच लवकरच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या सर्व स्थानकात राबविण्यात येईल.

Body:लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये विना आरक्षित तिकीट प्रवाशांना सीट पकडताना धावपळ होत असे, यामुळे अनेकदा वाद विवादाच्या घटनाही घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या सर्वांना आळा घालण्यासाठी हा नवीन प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे.

Conclusion:या बायोमेट्रिक मशीनवर प्रवाशाला अंगठा लावल्यावर विनाआरक्षित डब्यातील जागा बुक करता येते. तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्याकडून तिकीट दिले जाते. त्यानंतरच रांगेने तिकीट दाखवूनच प्रवाशांना गाडीत सोडले जातेय. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रवासी वर्गाने या प्रणाली बाबत समाधान व्यक्त केले आहे.
वॉकथ्रू
बाईट प्रवासी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.