ETV Bharat / state

Nitish Kumar News : नितीश कुमार येणार मुंबईच्या दौऱ्यावर... शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची भेट घेणार - नितीश कुमार शरद पवार भेट

देशात विरोधकांची एकजूट करण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न चालू आहेत. या पार्श्वभूमीवर संयक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

नितीश कुमार न्यूज
Nitish Kumar News
author img

By

Published : May 8, 2023, 12:07 PM IST

Updated : May 8, 2023, 3:02 PM IST

विवेक भावसार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ११ मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फोनवरून चर्चा करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्नाटकच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या आघाडी सामील होणार का आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची कमान हाती घेतल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती तिसऱ्या आघाडीची. भाजप विरोधी तिसरी आघाडी एकवटत असताना यामध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांची भूमिका काय असेल आणि कोणत्या मुद्द्यांवर हे पक्ष एकत्र येतील याची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढाकार घेत आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर हे सुद्धा यात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील का यासाठी या नेत्यांकडून प्रयत्न सुरू केल्या गेले आहेत यापूर्वी केसीआर आणि ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेतच.

11 तारखेला मुंबईत भेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे यासाठी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती पवार यांनी दिली तर या संदर्भात कर्नाटकच्या निवडणुका नंतर होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यासाठी स्वतः नितीश कुमार येत्या 11 मे रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी नितीश कुमार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तिसऱ्या आघाडीत महाराष्ट्रातील या दोन पक्षांनी सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार जर पाहिलं तर भाजप विरोधातली आपली धार शरद पवार यांनी पुन्हा एकदा तीव्र केली आहे मधल्या काळात शरद पवार हे भाजपला पूरक भूमिका घेताना दिसले आहेत अशी टीका त्यांच्यावर केली गेली मात्र असे असले तरी भाजपला रोखायचे असेल तर नेमके काय करायला पाहिजे याचा वस्तू पाठच शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून दिला होता त्याचप्रमाणे विरोधकांनाही सोबत घेऊन भाजपला रोखता येऊ शकते हे पवारांनी दाखवून दिले असल्याने पवार आता पुन्हा एकदा त्याच भूमिकेत येतील आणि तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे होणार सहभागी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा नीतीश कुमार भेट घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेनेने घेतलेली ठाम भूमिका आणि तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी दर्शवलेली संमती पाहता उद्धव ठाकरे हे तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील आणि भाजपला कडाडून विरोध करतील अशी शक्यता आहे. मात्र शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांमुळे दुखावले गेलेले उद्धव ठाकरे तिसऱ्या आघाडीत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कशी भूमिका घेतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल, असेही भावसार म्हणाले.

पंतप्रधान पदाचा चेहरा कोण?- राष्ट्रीय राजकारणात गेली 40 वर्ष असणाऱ्या शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा कधीही लपून राहिलेली नाही. मात्र तशी संधी शरद पवारांना प्रत्यक्षात कधी आली नाही काँग्रेसमध्ये असताना त्यांना पंतप्रधान पदाने हुलकावणी दिल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पक्षाला पुरेसे संख्याबळ कधीच मिळू शकले नाही. आजही महाराष्ट्रात केवळ चार खासदारांच्या जोरावर आपल्याला पंतप्रधान पद मिळणार नाही हे शरद पवार यांना पक्के ठाऊक आहे. तसेच तिसरी आघाडी होताना पंतप्रधान पदाचा चेहरा जर आत्ताच त्यांनी जाहीर केला तर आघाडी टिकणार नाही त्यामुळे ज्या पक्षाचे खासदार जास्त त्या पक्षाचा पंतप्रधान होईल अशा अलिखित नियमावर तिसरी आघाडी उभी राहते आहे. त्यामुळे भविष्यात जर नितीश कुमार किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त असेल तर त्यांच्यापैकी कोणी पंतप्रधान झाल्यास शरद पवार यांना त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही मात्र तूर्तास तरी पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यापेक्षा आघाडी करून भाजपला रोखणे एवढेच तिसऱ्या आघाडीचे प्राधान्य असावे असेही भावसार म्हणाले.

हेही वाचा-

Chandrasekhar Bawankule News: शरद पवार आपला पक्ष दुसऱ्याला देवू शकत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Sharad Pawar News: ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित

MRF Supercross Competition: नाशिककरांनी अनुभवला वेगवान बाईकचा थरार; एमआरएफ सुपर क्रॉस स्पर्धेत झाली अटीतटीची लढत

etv play button

Last Updated : May 8, 2023, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.