ETV Bharat / state

MNS Vice President Resignation : राज ठाकरेंना मोठ धक्का; नवी मुंबई उपाध्यक्षासह 5 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Navi Mumbai MNS

नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे खिंडार पडले आहे. मनसे उपशहर अध्यक्षांसह पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. उपमहापौरांनी अचानक राजीनामा दिल्याने नवी मुंबई मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 11, 2023, 4:18 PM IST

नवी मुंबई उपाध्यक्षासह 5 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी मुंबई : नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले आहे. मनसे उपशहर अध्यक्षासह पाच बड्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोठ्या आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. उपशहराध्यक्षाने अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे नवी मुंबई मनसे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

आर्थिक हितसंबंधांमुळे राजीनामा : नवी मुंबई मनसे शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्यासह 5 पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत पक्षीय पद त्यागले आहे. मनसेचे प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काम करण्यात अडचणी येत असल्याचे कारण पुढे करत हे राजीनामे देण्यात आले आहेत. शहराध्यक्ष गजानन काळे यांचे नवी मुंबई महापालिकेत आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अधिकारीवर्गाकडून आमच्या पत्रांची साधी दखल देखील घेतली जात नसल्याचे मनसे उपशहराध्यक्ष प्रसाद घोरपडे म्हणाले. याबाबत आपण वरिष्ठांना वारंवार तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने पक्षात नाराजी असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.

मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा : नवी मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आपल्याला अंतर्गत बाबींमध्ये त्रास देण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून काळे करत होते. मी अनेकवेळा याबाबत वरिष्ठांना सांगितले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपवला असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. गजानन काळे आपल्याविरोधात बैठका लावत असल्याचे सांगत काळे यांनी आपल्याला कार्यालयात येऊन धमकावल्याचा गंभीर आरोप फडतरे यांनी केला आहे.

नेतृत्वबदल करण्याची मागणी : गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबईत नेतृत्वबदल करण्याची अनेक पदाधिकाऱ्यांकडून मागणी होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या या राजीनामा सत्रावरून आता शहराध्यक्ष गजानन काळे हटाओ ही मागणी पुन्हा जोर धरणार असल्याचे चित्र आहे. मनसेचे प्रवक्ते असलेले गजानन काळे याअगोदर देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या पत्नीशी असलेल्या कौटुंबिक वादावरून खुद्द त्यांच्या पत्नीने मिडिया समोर येत काळे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांपैकी नवी मुंबईतील मनपा अधिकाऱ्यांशी काळे यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप देखील काळे यांच्या पत्नीने केला होता.

आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप : याबाबत काळे यांच्या पत्नीने मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जावून भेट देखील घेतली होती. मात्र गजानन काळेंवर कोणतीही पक्षीय कारवाई न होता वाद सामंजस्याने मिटवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मनसे पदाधिकाऱ्यांनी काळे यांचे मनपा अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला आहे. हे सर्व प्रकरण गजानन काळे आणि मनसेचे वरिष्ठ नेते कसे हाताळतायत याकडे मनसैनिकांसह नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Acharya Degree Awarded : जैन समाजाच्या दोन आध्यात्मिक गुरुंना आचार्य पदवी प्रदान, रामदेव बाबांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.