ETV Bharat / state

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, डोंगरी परिसरातून 50 कोटींचे ड्रग्स जप्त तर महिलेसह तिघांना अटक - मुंबई एनसीबीची मोठी कारवाई

एनसीबी मुंबई विभागाने डोंगरी परिसरातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडले आहेत. त्यामुळे अमली पदार्थ तस्करीचे मोठे सिंडिकेट उघडकीस आले आहे. एनसीबीने डोंगरी परिसरातून 20 किलो एमडी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक केली आहे.

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई
मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई
author img

By

Published : Jun 10, 2023, 9:57 PM IST

मुंबई : एनसीबी मुंबई विभागाने डोंगरी, मुंबई येथून अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. 20 किलो मेफेड्रोन जप्त करत 3 जणांना अटक केली आहे. अनेक शोध मोहिमांमध्ये डोंगरी येथून 20 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून सिंडिकेटच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली आहे. एक कोटी दहा लाख 24 हजार रुपये रोख रक्कम आणि 186.6 ग्राम सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत.

डग्जसह आरोपी
डग्जसह आरोपी

तस्करी करणाऱ्या सिंडिकेटला जोरदार दणका - एनसीबी मुंबईने आंतरराज्य अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटला जोरदार दणका दिला आहे. ज्यामध्ये एकूण 20 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आणि मुंबईच्या डोंगरी परिसरातून एका महिला सूत्रधारासह प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थाच्या पैशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून जमवलेली प्रचंड रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. डोंगरी, मुंबई येथे असलेल्या एका सिंडिकेटबद्दल प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली होती. हे सिंडिकेट मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनच्या तस्करीमध्ये सक्रियपणे गुंतलेले आणि मुंबई मेट्रोपोलीटन रीजनच्या विविध भागांमध्ये ड्रग्ज वितरीत करत असल्याची गुप्त माहिती एनसीबीला प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने कारवाई केली असता डोंगरी येथील एन. खान नावाच्या व्यक्तीची ओळख पटली. त्यानुसार त्याच्यावर पाळत ठेवून एका मोठ्या सिंडिकेटचा खान भाग असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवसांपूर्वी, मेफेड्रोनच्या मोठ्या प्रमाणात डील झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. ज्यासाठी आर्थिक व्यवहार देखील अंतिम टप्प्यात ठरवण्यात आला होता.

महिला सूत्रधार आरोपी
महिला सूत्रधार आरोपी

सगळे सुत्रधार पोलिसांच्या जाळ्यात - 9 जून म्हणजेच काल विश्वसनीय माहिती मिळाली ज्यामध्ये एन. खान याच्याकडे डोंगरी येथील मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनच्या साठ्याची माहिती मिळाली. ताबडतोब, एनसीबी-मुंबई टीमने एन.खानच्या डोंगरीतील ठिकाणी सापळा लावला आणि त्याचा सहकारी ए.अली देखील परिसरात उपस्थित असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे अवैध ड्रग्ज उपलब्ध असल्याचे संकेत मिळताच ए.अली याला अडवून त्याच्याकडून 3 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन.खानच्या घराची झडती घेऊन तात्काळ पाठपुरावा केल्याने त्याच्या घरातून आणखी 2 किलो जप्त करण्यात आले. एन.खानच्या स्पॉट चौकशीदरम्यान एएफ शेख नावाच्या डोंगरी येथील महिलेची ओळख पटली. ती महिलेने त्याला ड्रग्सचा पुरवठा केला होता.

मुंबई एनसीबीची मोठी कारवाई - त्या महिलेच्या ठाव ठिकाणाची माहिती मिळाली त्यानंतर NCB-मुंबईची दुसरी टीम त्या भागात गेली. पत्त्याची पुष्टी केल्यानंतर, अधिकारी ड्रग्ज पुरवठादार महिलेच्या म्हणजेच एएफ शेखच्या घरी गेले. प्राथमिक घराच्या झडतीदरम्यान, 15 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले जे आवारात लपवून ठेवले होते. पुढील सर्च ऑपरेशन मध्ये एक कोटी दहा लाख 24 हजार रुपयांची रक्कम आणि 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. स्पॉट चौकशी दरम्यान, सुरुवातीला महिलेने चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु एनसीबीच्या अधिका-यांनी कुशलतेने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तिने कबूल केले की, जप्त केलेली रक्कम आणि सोने हे ड्रगच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाच्या आर्थिक उत्पन्नातून जमा झाले होते. आणखी काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

10 वर्षांपासून या अवैध ड्रग्ज तस्करी व्यवसायात - तिन्ही आरोपींकडे चौकशी केली असता, ते गेल्या 7-10 वर्षांपासून या अवैध ड्रग्ज तस्करी व्यवसायात गुंतल्याचे निदर्शनास आले. पुरवठादार महिलेचे जाळे अनेक शहरांमध्ये पसरले होते आणि ती करोडो रुपयांच्या ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असल्याने, ए एफ शेखने अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांना तोंड देण्यासाठी एक कंपनी देखील स्थापन केली होती. या सिंडिकेटमधील काही सदस्यांवर आधीच एनडीपीएस कायदा, 1985 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.. ड्रग्जच्या पैशातून निर्माण झालेल्या उर्वरित साथीदारांचा आणि इतर मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सखोल तपास केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.