ETV Bharat / state

संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीमध्ये 'बिग बॉस मराठी'तील कलावंतांचा सहभाग - गोरेगाव

संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात बिग बॉसच्या घरात राहून गेलेले पुष्कर जोग, रेशम टिपणीस, स्वप्नाली पाटील आणि सई लोकूर हे प्रचार रॅलीत सहभागी केले.

बिग बॉस मराठीतील कलावंतांचा प्रचार रॅलीत सहभाग
author img

By

Published : Apr 19, 2019, 11:56 PM IST

मुंबई - उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेल्या संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी आज बिग बॉस मराठीचे कलाकार सहभागी झाले. यावेळी या कलाकारांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढायला लागला आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कलाकारांनी निवडणुकीत रंग भरल्यानंतर आता उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकार मंडळी मतदारांना आकर्षित करताना दिसत आहेत. उत्तर पश्चिम मतदारसंघातील गोरेगाव बिंबिसार नगर, जोगेश्वरी पूर्वेचा काही भाग याठिकाणी मराठी मतदार मोठ्या संख्येने राहतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी निरुपम यांनी थेट बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात बिग बॉसच्या घरात राहून गेलेले पुष्कर जोग, रेशम टिपणीस, स्वप्नाली पाटील आणि सई लोकूर हे यांना प्रचार रॅलीत सहभागी केले.

या सगळ्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती. संजय निरुपम यांचे काम आम्ही पाहिले आहे. त्यामुळेच आपण त्यांना मत देण्याचे आवाहन करत असल्याचे या चौघांनी सांगितले. ही प्रचार रॅली गोरेगावच्या बिंबिसार नगर येथुन निघून जोगेश्वरी येथील महाकाली परिसरात विसर्जित झाली.

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण या कलाकारांना बोलावल्याचे संजय निरुपम यांनी मान्य केले. त्यांच्या माध्यमातून या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्याशी निरुपम यांची या मतदारसंघात लढत होणार आहे. अशावेळी अमराठी मताएवढीच मराठी मतंसुध्दा निर्णायक ठरणार आहे. अशात या मतदारांना आपलेसे करण्यासाठी निरुपम यांनी बिग बॉस मराठीच्या कलाकाराची मदत घेतली.

आता या कलाकारांनी केलेल्या प्रचार रॅलीचा निरुपम यांना मराठी मतदाराच्या जवळ जाण्यासाठी कितपत उपयोग होतो, ते निवडणुकीचे निकाल लागल्यावर स्पष्ट होईल.

Intro:मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेल्या संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी आज बिग बॉस मराठीचे कलाकार सहभागी झाले. निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढायला लागलाय. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कलाकारांनी निवडणुकीत रंग भरल्यानंतर आता उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकार मंडळी मतदारांना आकर्षित करताना दिसतायत. उत्तर पश्चिम मतदारसंघातील गोरेगाव बिंबिसार नगर, जोगेश्वरी पूर्वेचा काही भाग हा मराठी मतदार मोठया संख्येने राहतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी निरुपम यांनी थेट बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात या घरात राहून गेलेले पुष्कर जोग, रेशम टिपणीस, स्वप्नाली पाटील आणि सई लोकूर हे या प्रचार रॅलीत सहभागी झाले.

या सगळ्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती. संजय निरुपम यांचं काम आपण पाहिलं असून त्यामुळेच आपण त्यांना मत देण्याचं आवाहन करत असल्याचं या चौघांनी सांगितले. ही प्रचार रॅली गोरेगावच्या बिंबिसार नगर येथुन निघून जोगेश्वरी येथील महाकाली परिसरात विसर्जित झाली.

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण या कलाकारांना बोलावल्याच संजय निरुपम यांनी मान्य केलं. त्यांच्या मद्यमातून या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यानी केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्याशी निरुपम यांची या मतदारसंघात लढत होणारे. अशावेळी अमराठी मता एवढीच मराठी मत सुध्दा निर्णायक ठरणारेत. अशात या मतदारांना आपलंसं करण्यासाठी निरुपम यांनी बिग बॉस मराठीच्या कलाकाराची मदत घेतली.

आता या कलाकारांनी केलेल्या प्रचार रॅलीचा निरुपम याना मराठी मतदाराच्या जवळ जाण्यासाठी कितपत उपयोग होतो. ते निवडणुकीचे निकाल लागल्यावर स्पष्ट होईल.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.