मुंबई: सेबीने नुकताच एक अंतरीम आदेश दिला असुन त्या नुसार रिलायन्स होम फायनान्स त्यांचे प्रवर्तक उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीघांना लोकांकडून पैसे उभारण्याच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असा आदेश दिला आहे. त्यानुसार त्यांना बाजारातील खरेदी विक्री किंवा कोणत्याही व्यवहारात प्रत्यभ अथवा अप्रत्यक्षपणे काम करता येणार नाही.
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने रिलायन्स होम फायनान्स चे अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींवर कंपनीशी संबंधित कथित फसवणुकी वरुन रोखे बाजारातून ही बंदी घातली आहे. अंबानी आणि इतरांना पुढील आदेशापर्यंत सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थाशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा सार्वजनिक कंपनीचे संचालक/प्रवर्तक म्हणून काम करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे असे सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. सेबी ने हे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला प्राप्त झालेल्या काही तक्रारी ज्यात कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाद्वारे पैसे काढणे, वळवणे आणि बँकांकडून अनेक फसवणूक मॉनिटरिंग रिटर्न्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.
-
Stock market regulator SEBI in an interim order restrained Reliance Home Finance, its promotor Anil Ambani and 3 others from buying, selling or dealing in securities, either directly or indirectly, in any manner whatsoever until further orders.
— ANI (@ANI) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Stock market regulator SEBI in an interim order restrained Reliance Home Finance, its promotor Anil Ambani and 3 others from buying, selling or dealing in securities, either directly or indirectly, in any manner whatsoever until further orders.
— ANI (@ANI) February 11, 2022Stock market regulator SEBI in an interim order restrained Reliance Home Finance, its promotor Anil Ambani and 3 others from buying, selling or dealing in securities, either directly or indirectly, in any manner whatsoever until further orders.
— ANI (@ANI) February 11, 2022