मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद (Bhima Koregaon and Elgar Parishad) प्रकरणातील आरोपी लेखक गौतम नवलखा (Gautam Navlakha released from jail) यांची कारागृहातून सुटका होत आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष एनआयए कोर्टातून नवलखा यांच्या सुटकेची ऑर्डर (release order) निघाली आहे. Mumbai Session Court, NIA Court, Latest news from Mumbai, Mumbai Crime
नवलखा संध्याकाळपर्यंत तुरुंगातून बाहेर- सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना एक महिन्यापर्यंत नजरकैदेत राहण्याचा अर्ज मंजूर केला होता. आज संध्याकाळपर्यंत नवलखा हे तळोजा तुरुंगातून बाहेर येतील. गौतम नवलखा यांच्या वकिलांकडून कारागृह अधीक्षक आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना ईमेल द्वारे रिलीज ऑर्डर पाठवण्यात आली आहे.