मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार आजपासून मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क करण्यात आला असल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
मजुरांना संबंधित रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे पोलिसांच्या मागणीनुसार बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्यांना तिकीट भाडे बेस्ट उपक्रमाच्या नियमित बस मार्गानुसारच प्रवासाच्या अंतरानुसार आकारण्यात येत होते.
बेस्ट कंडक्टर संबंधित मजूर जमतात त्याठिकाणी बेस्टमधून प्रवास करण्यापूर्वी बेस्ट भाडे जमा करत होते. मात्र आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असून कोणतेही भाडे आकारण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.