ETV Bharat / state

BEST : आर्थिक संकटातील बेस्टच्या कंत्राटी बसबाबत फेरविचाराची मागणी

मुंबईकरांना परिवहन सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटदाराच्या बसेस मोठ्या प्रमाणात चालवल्या जात ( contractor buses operated by BEST ) आहेत. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.

BEST
बेस्ट आर्थिक संकटात
author img

By

Published : Oct 31, 2022, 7:03 PM IST

मुंबई : मुंबईकरांना परिवहन सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटदाराच्या बसेस मोठ्या प्रमाणात चालवल्या जात ( contractor buses operated by BEST ) आहेत. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या बसेस रस्त्यावर बंद होत आहेत. यामुळे बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारांच्या बसेस चालवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी भाजपाचे माजी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली आहे.

BEST
बेस्ट आर्थिक संकटात

बेस्टमध्ये खासगी कंत्राटदाराच्या बसेस : मुंबई महापालिकेचा अंगीकृत असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत ( Transport department in financial trouble ) आहे. बेस्टला सुमारे ९ हजार कोटींची तूट आहे. पालिकेने बेस्टला आतापर्यंत ५ हजार कोटीहून अधिक आर्थिक मदत केली आहे. आर्थिक अडचणीत असल्याने बेस्टने कंत्रादाराकडून खासगी एसी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपी ग्रुप, मातेश्वरी ट्रान्सपोर्ट, हंसा ट्रान्सपोर्ट, डागा आदी कंत्राटी कंपन्यांकडून एसी बसेस चालवल्या जात आहेत. यापैकी बहुतेक बसेस एसी असल्याने प्रवाशांना गारेगार प्रवास करण्यास मिळत आहे. यासाठी बेस्ट उपक्रम कंत्राटदारांना प्रति किलोमीटर ४० ते ८० रुपये अदा करत आहे. यामध्ये इंधन, मेंटेनंस तसेच कंत्राटदारांच्या ड्रायव्हरचा पगार याचा समावेश आहे. यामुळे खर्चात कपात झाला असून प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे.

बेस्टचा स्वतःचा ताफा कमी होतोय : बेस्टने कंत्राटदाराकडून बसेस भाडेतत्वावर घेताना आपल्या स्वतःच्या बसचा ताफा वाढवलेला नाही. यामुळे येत्या महिन्यात बेस्टच्या २०० ते २५० बसेस ताफ्यातून बॅड होणार असल्याने बेस्टकडे स्वतःच्या १२०० ते १३०० बसेस राहतील. बेस्टच्या बसचा ताफा कमी होत आहे. बेस्टच्या स्वतःच्या एका बसमधून ७० ते ८० प्रवासी प्रवास करतात, मात्र कंत्राटदाराच्या बसमधील आसनसंख्या कमी असल्याने ३० ते ४० प्रवासी प्रवास करत आहेत. कंत्राटी खासगी बसमुळे प्रवासी संख्या क्षमता कमी झाली आहे. जितके प्रवासी एका बसच्या फेरीमध्ये जायला हवेत तितके प्रवासी एका फेरीत जात नाहीत असे बेस्टमधील भाजपचे माजी सदस्य सुनिल गणाचार्य यांनी संगितले.

बेस्टने निर्णयाचा फेरविचार करावा : प्रवाशांना सेवा देणे हा बेस्टचा उद्देश ( BEST aims to serve passengers) आहे. मात्र बेस्टने आणि कंत्राटदाराने पैसे वाचवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कंत्राटदाराकडून बसेसचे वेळेवर मेंटेनंन्स ठेवले जात नाही. यामुळे बसेस रस्त्यावर मध्येच बंद पडत आहेत. कांदिवली येथे एका बसला आग लागली आहे. बेस्टच्या स्वतःच्या बसेसचा ताफा कमी झाल्याने ड्रायव्हर कंडक्टर आदी कर्मचाऱ्यांना दुसरी कामे दिली जात आहेत. स्वतःच्या बस नसल्याने इंजिनियरिंग विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना काम नाही. त्यांना बसून पगार दिला जात आहे. यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे कंत्राटदारांकडून सर्व बस घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे सुनील गणाचार्य यांनी म्हटले आहे.

बेस्ट आर्थिक संकटात : बेस्ट उपक्रमाकडे काही वर्षांपूर्वी स्वतःच्या मालकीच्या ४ हजाराहून अधिक बसेसचा ताफा होता. बससाठी लागणारे डिझेल आणि त्यावर होणार परिरक्षणाचा खर्च मोठा होता. यामुळे बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग आर्थिक अडचणीत आला. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने बँकांकडून कर्ज घेतले. मात्र नंतर बँकांनी कर्ज देणे बंद केले. यामुळे पालिकेने बेस्टला १६०० कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड बेस्टने केली. या दरम्यान बेस्टवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने कृती आराखडा बनवून दिला. त्यात बेस्टच्या बसेस खासगी कंत्राटदाराकडून चालवण्याचा सल्ला देण्यात आला. यानुसार बेस्टने आपला बसचा ताफा कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेस्टने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात २२३६ कोटींची तूट दाखवली आहे. बेस्टला एकूण ९ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे. पालिकेने २०१५ पासून आतापर्यंत बेस्टला ५३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

एसी इलेक्ट्रिक बसवर भर : बेस्ट उपक्रमाने आपला खर्च कमी करण्यासाठी प्रति किलोमीटर ४० ते ८० रुपये दराने एसी बसेस भाडे तत्वावर घेतली ( AC Buses On Rant Basis) आहे. सध्या भाडेतत्त्वावरील १८४० बसेस चालवल्या जात आहेत. मुंबई हे मेट्रोपॉलिटन शहर असल्याने १५ वषे पूर्ण झालेली जड वाहने नियमानुसार चालवता येत नाही. बेस्ट अशा १५ वर्षे पूर्ण झालेल्या बसेस भंगारात काढते. २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफयातील सर्व १३०० बसेस काढून त्या जागी एसी बस चालवल्या जाणार आहेत. २०२७ पर्यंत बेस्टचा १०० टक्के एसी इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असणार आहे अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.