ETV Bharat / state

BEST Double Decker AC Bus : बेस्टची पहिली एसी डबलडेकर बस २१ फेब्रुवारीपासून "या" मार्गावर धावणार

बेस्टची पहिली एसी डबलडेकर बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीएपर्यंत २१ फेब्रुवारीपासून धावणार आहे. बसला आरटीओकडून परवानगी मिळाल्याने बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टने एसी, इलेकट्रीक बसला प्राधान्य दिले आहे.

BEST Double Decker  AC Bus
BEST Double Decker AC Bus
author img

By

Published : Feb 19, 2023, 9:12 PM IST

मुंबई : मुंबईची जीवननवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाची शान म्हणू डबलडेकर बसची ओळख आहे. बेस्टच्या जुन्या बसचे आयुर्मान संपल्याने नव्याने इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस घेण्यात आली आहे. या बसला आरटीओकडून परवानगी मिळाली आहे त्यामुळे मंगळवार २१ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर ही बस धावणार आहे.

९०० इलेक्ट्रिक एसी बसेस घेण्याचा निर्णय : मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट या दोन उपक्रमाकडून नागरिकांना प्रवास करण्यासाठी वाहतूक सेवा पुरवली जाते. रेल्वेने ७० लाख तर बेस्टच्या बसने ४० लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या बसेस मुंबईमध्ये सर्व ठिकाणी जात असल्याने तसेच तिकिटाचे दर कमी असल्याने प्रवाशांकडून बेस्टच्या बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टने एसी, इलेकट्रीक बसला प्राधान्य दिले आहे. यामुळे बेस्टकडून पर्यावरण रक्षण केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने आपल्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसच्या ऐवजी नव्या ९०० इलेकट्रीक एसी बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिली एसी बस : बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर बस येईल यासाठी गेले कित्तेक वर्षे तारखा देण्यात आल्या. मात्र बस काही ताफ्यात दाखल झाली नव्हती. बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या बसचे मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदघाटन केले होते. मात्र त्यानंतर बसच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये चूक असल्याने या बसला परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे बस नव्याने पुन्हा बनवण्यात आली. ११ फेब्रुवारी रोजी ही बस मुंबईमध्ये दाखल झाली. ही बस रस्त्यावर चालवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या बाकी असल्याने बेस्टच्या कुलाबा येथील आगारात उभी करण्यात आली होती.

२१ फेब्रुवारीपासून रस्त्यावर धावणार : बस रत्स्यावर चालवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आरटीओकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे आता २१ फेब्रुवारी पासून ही बस रस्त्यावर धावणार आहे. बेस्टची पहिली एसी इलेक्ट्रिक बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते इंसिपी या मार्गावर धावणार आहे. या बसचे तिकीट ६ रुपये असणार आहे. प्रवाशांना ६ रुपयात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए पर्यंतचा गारेगार प्रवास करता येणार आहे.

बसमध्ये या सुविधा : ही डबलडेकर बस एसी असून इलेक्ट्रिक वर चालणारी आहे. एका बसमध्ये ५४ प्रवासी बसू शकतील इतकी आसन क्षमता आहे. बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अडचण निर्माण होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. बेस्टच्या ताफ्यातील बसेस, बेस्टच्या मालकीच्या बसेस, १८५४ भाडेतत्वावरील बसेस १७९३, एकूण बसेस ३६२७

हेही वाचा - Uddhav thackeray on Amit Shah : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंची खोचक टीका, तर शाह म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.