ETV Bharat / state

मुंबईकरांच्या 'बेस्ट' प्रवासासाठी दाखल होणार 700 इलेक्ट्रिक बसेस - Double Decker electric Bus

Best Double Decker Electric Bus : इलेक्ट्रिक बसेस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. आता 700 डबलडेकर बसमुळं 'बेस्ट'च्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.

Best Double Decker electric Bus
Best Double Decker electric Bus
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 5:18 PM IST

मुंबई Best Double Decker electric Bus : मुंबईकरांच्या सेवेसाठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला होता. मात्र बस निर्मितीचं टेंडर दिलेल्या कंपनीनं बसेसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळं बेस्टनं कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनी बसची निर्मिती करणार आहे. त्यामुळं लवकरच मुंबईकरांच्या सेवेत 700 इलेक्ट्रिक बसेस रुजू होतील, असा विश्वास बेस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

200 बस पुरवण्याची तयारी : बेस्ट प्रशासनानं मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुखदायक व्हावा यासाठी 900 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार बस पुरवठा करण्याचं कंत्राट ई कॉसिस मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसंच स्विच मोबिलिटी ऑटोमॅटिक या दोन कंपन्यांना देण्यात आलं होतं. यापैकी स्विच मोबिलिटी ऑटोमेटिव्ह या कंपनीनं 200 बस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ई कॉसिस मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सातशे डबल डेकर बस पुरवठा करण्यास नकार दिला होता. त्यामुळं या कंपनीला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याचा इशारा बेस्ट प्रशासनातर्फे देण्यात आला होता, अशी माहिती वैद्य यांनी दिली.

बस पुरवठा करणारी कंपनी नरमली : बेस्ट प्रशासनानं कारवाईचा इशारा दिल्यानंतर ई कॉसिस-मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आता सातशे इलेक्ट्रिक डबल डेकर बस पुरवण्यासाठी पुन्हा एकदा तयारी दर्शवली आहे. या बसेस लवकरात लवकर पुरवल्या जातील, असं कंपनीकडून कळविण्यात आल्याचं वैद्य यांनी सांगितलं. त्यामुळं आता मुंबईकरांच्या सेवेत लवकरच या नव्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस रुजू व्हायला सुरुवात होईल, असंही ते म्हणाले.

कशी असेल बस? : बेस्टच्या ताब्यात रुजू होणाऱ्या या नव्या इलेक्ट्रिक बसेसची ऑपरेशनल क्षमता 180 किलोमीटर इतकी आहे. पाऊण तासांच्या चार्जिंगमध्ये या बसेस 100 किलोमीटरपर्यंत जाऊ शकणार आहेत, तर बस चार्ज व्हायला 80 मिनिटे लागणार असल्याचं वैद्य यांनी सांगितलं. अल्युमिनियमपासून या बसची बॉडी तयार करण्यात येत आहे. यातील एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असणार आहे. एका वेळेस या बसमधून 90 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अशा पद्धतीच्या काही बसेस नुकत्याच मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत 'बेस्ट' बसेसला लोकलनंतर मुंबईची लाईफलाइन म्हटलं जातं. 'बेस्ट' बसचे तिकीट दर अत्यंत स्वस्त असल्यानं मुंबईकर नेहमीच 'बेस्ट' बसनं प्रवास करणं पसंत करतात. त्यामुळं आता मुंबईकरांना या बसेसमधून जलद प्रवासाचा आनंद मिळेल, अशी ग्वाही वैद्य यांनी दिली.

हेही वाचा -

  1. 'गो बॅक' म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र; कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर अखेर भुजबळांनी अर्धवट सोडला दौरा
  2. 'जो महापुरूषांची जात काढतो त्याच्याबद्ल बोलायचं नाही', जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका
  3. मी धमक्यांना घाबरत नाही, मला कोणी गावबंदी करू शकत नाही; मंत्री छगन भुजबळांची आक्रमक भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.