मुंबई - देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्याही 33 हजारांच्या वर पोहोचली आहे. या परिस्थितीत अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स उपलब्ध नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. बेड्सअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील कोरोना बाधितांवर उपचार करणारी रुग्णालये आणि कोविड सेंटर्समधील बेड्सची परिस्थिती कशी आहे? याबाबत घेतलेला आढावा.
- मुंबई -
- पालिका आणि खासगी रुग्णालये 17 हजार 678
- कोरोना समर्पित रुग्णालय, कोरोना केअर सेंटर 2 (जम्बो कोविड सेंटर) - 14 हजार 728
- आयसीयू बेड्स - 1916
- ऑक्सिजन बेड्स - 8907
- व्हेंटिलेटर बेड्स - 1133
- कोरोना केअर सेंटर 1 - 46589
- कोरोना केअर सेंटर 2 - 23739
--------------------------------------
- ठाणे -
- एकूण ऑक्सिजन युक्त बेड्स - 7319, त्यापैकी रिकामे बेड्स - 4096
- एकूण आयसीयू बेड्स - 1663, त्यापैकी रिकामे बेड्स - 1100
- एकूण व्हेंटिलेटरचे बेड्स - 626, त्यापैकी रिकामे बेड्स - 313
--------------------------------------
- पुणे -
- आयसीयू बेड्स(व्हेंटीलेटर) - ७१०
- शिल्लक बेड्स - ४९
- आयसीयू बेड्स (बिना व्हेंटीलेटर) - ९४७
- ऑक्सिजन बेड्स - ५ हजार ४७०
- आयसोलेशन बेड्स - १२ हजार ७०९
- एकूण बेड्स - १९ हजार ८३६
----------------------------------------
- नाशिक -
- शासकीय रुग्णालय ६ आणि खासगी रुग्णालय एकूण बेड्स ६४
- व्हेंटिलेटर बेड्स - १४८
- शिल्लक बेड - १
- ऑक्सिजन बेड्स - १ हजार ६७
- शिल्लक ऑक्सिजन बेड्स - २६३
- आयसीयू बेड्स - २७५
- शिल्लक आयसीयू बेड्स - ५४
- जनरल बेड्स - २ हजार २३५
- शिल्लक जनरल बेड्स - १५१
-----------------------------------
- अकोला -
- खासगी व सरकारी रुग्णालय - ४५० बेड्स
- आयसीयू बेड्स - ९४
------------------------------------
- नागपूर -
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड वार्ड - ६०० बेड्स
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आयसीयू बेड्स - २००
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हेंटीलेटर बेड्स - ८३
- मेयो कोविड वार्ड बेड्स - ६००
- मेयो कोविड वार्ड आयसीयू बेड्स - १६० बेड
- मेयो कोविड वार्ड व्हेंटिलेटर बेड्स - ८२ बेड
- इतर ७२ रुग्णालयांमध्ये ५ हजार बेड्स कोरोना बाधितांसाठी राखीव
-------------------------------------------------------
- जळगाव - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. त्यातील 32 हजार 941 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून सद्यस्थितीत 9 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांमधील 669 रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. तर 287 अत्यावस्थ रुग्णांवर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येची अशी परिस्थिती असताना बेड्स उपलब्धतेचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर्समध्ये 12 हजार 854 बेड्स उपलब्ध आहेत. त्यात 263 बेड्स हे अतिदक्षता विभागाचे आणि 1 हजार 643 बेड्स हे ऑक्सिजनची व्यवस्था असणारे आहेत.
- एकूण बेड्सची संख्या - १२ हजार ८५४
- आयसीयू बेड्सची संख्या - २६३
- ऑक्सिजन बेड्सची संख्या - १ हजार ६४३
---------------------------------
- औरंगाबाद - शहरात कोरोना रुग्णांसाठी 800 बेड्स ठेवण्यात आले आहेत तर 187 व्हेंटिलेटर आणि 902 ऑक्सिजन बेड्स आहेत. सध्या 5 हजार 710 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण झाल्याने रुग्णांना उपचार घेण्यासाठी ना बेड्स शिल्लक आहेत ना व्हेंटिलेटर. त्यामुळे रुग्णांना आता प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली आहे.
- कोरोना रुग्णांसाठी एकूण बेड्स - ८००
- व्हेंटिलेटर बेड्स - १८७
- ऑक्सिजन बेड्स - ९०२