ETV Bharat / state

'सोशल मीडिया'त व्यक्त होताना सामाजिक भान ठेवा - ज्येष्ठ समाजवादी नेत्यांचे आवाहन - माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत बातमी

राज्यात अनुसूचित जाती व जमातीतील युवकांची हत्या झाल्यानंतर राज्यात समाज माध्यमांवर सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज विरोधक करत आहेत. मात्र, राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण हाऊ नये यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना सामाजिक भान राखावे, असे कळकळीचे आवाहन राज्यातील समाजवादी नेत्यांनी केले आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 15, 2020, 7:45 AM IST

मुंबई - नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनुसूचित जाती व जमातीतील युवकांची हत्या झाल्यानंतर राज्यात समाज माध्यमांवर सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज विरोधक करत आहेत. मात्र, राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण हाऊ नये यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना सामाजिक भान राखावे, असे कळकळीचे आवाहन राज्यातील समाजवादी नेत्यांनी केले आहे.

दोन्ही अनुसूचित जाती-जमातीतील युवकांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरील दोन्ही समाजाच्या अत्यंत स्फोटक प्रतिक्रिया येत असल्याने ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त करणारे पत्रक जारी केले आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि हमाल पंचायतीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव या नेत्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक लावणाऱ्या घटनांचा निषेध करत, संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

मागील चार-पाच दिवसात महाराष्ट्राच्या प्रगतीशील समजल्या गेलेल्या परंपरेला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. नागपूर जिल्ह्याच्या नारखेड तालुक्यातील अरविंद बनसोड या युवकाची राजकीय व जातीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे, पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे - सौदागर गावातील विराज जगताप या २० वर्षीय युवकाची मुलीवरील प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही अमानूष, माणुसकीला कलंक लावणार्‍या घटनांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या दोन्ही निर्घृण हत्यांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झालेच पाहिजे, अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करीत आहोत असेही या पत्रकात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी विचारांचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात समाजात एक मोठा प्रगतीशील वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण व विचारांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, ही या प्रगतीशील वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडलीच पाहिजे. त्याचप्रमाणे, अशा गंभीर सामाजिक दृष्ट्या संवेदनशील घटनांबाबत सोशल मीडियातून व्यक्त होताना प्रत्येकाने अतिशय जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित आहे, असे आवाहन या पत्रात ज्येष्ठ मान्यवरांनी केले आहे.

सोशल मीडियात या दोन्ही घटनांचा एकीकडे निषेध व्यक्त केला जात आहे. तर मोठ्या प्रमाणात जातीय द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. त्याला ही वेगळ्या वर्गातून स्फोटक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्या अधिक प्रक्षुब्ध करून राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक-राजकिय अस्थिरता निर्माण करण्याचा काही समाजकंठक प्रयत्न करत असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्या समाज विरोधकांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे. याची जबाबदारी अनुसूचित जाती व जमातीवर असली, तरी बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजावर ती अधिक मोठी आहे. दोन्ही समाजात कष्टकरी वर्ग प्रचंड संख्येने आहे. अनुसूचित जाती व जमातीने "जशास तसे" उत्तर देण्याच्या भूमिकेत असणे हितावह नाही. तसेच मराठा समाजाने भ्रामक सामाजिक प्रतिष्ठा जोपासणे अयोग्य आहे. सामाजिक अभिसरण व विचारांची देवाणघेवाण यातूनच सामाजिक प्रगती व स्थैर्य साध्य होते, असा आमचा दृढ विश्वास असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक स्थैर्य राखण्याच्या दृष्टिकोनातून लेखक, पत्रकार आणि काही नेत्यांनी संयुक्त रित्या सामाजिक आवाहन करणारे पत्र जरी केले असून यात भालचंद्र मुणगेकर, प्रेमानंद गझवी, जयसिंगराव पवार, प्रताप आसबे प्रवीण गायकवाड, प्रज्ञा दया पवार, श्रीमंत कोकाटे, जयंत पवार, मधु कांबळे, सुभाष लोमटे आणि मधु मोहिते यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा - Coronavirus: राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा ५० हजारांवर, रविवारी ३,३९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.