ETV Bharat / state

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास कारवाई, प्रत्येक प्रभागात क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय - सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या प्रत्येक प्रभागात क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकांची मंजुरी मिळाल्यानंतर येत्या दहा दिवसांत याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

Mumbai municipality
Mumbai municipality
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 10:37 PM IST

मुंबई : राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर पडल्यानंतर पालिकेनं पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील रस्त्यांवर क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे. बृन्मुंबई महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रस्ते, चौक, महत्त्वाच्या ठिकाणी 720 क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी 30 ते 35 क्लीन-अप मार्शल नियुक्त करण्याची पालिकेची योजना आहे. क्लीनअप मार्शलनं ठोठावलेल्या दंडाच्या 50 टक्के रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे, तर 50 टक्के रक्कम पालिकेला मिळणार आहे.

सध्या पोलीस पडताळणी सुरू : मुंबईतील रस्त्यांवर तैनात करण्यात येणाऱ्या क्लीनअप मार्शलना त्यांची संपूर्ण ओळख, मोबाइल क्रमांक आणि नेमप्लेट असणारे ड्रेस दिले जातील, असं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे. क्लीनअप मार्शलसोबत गैरवर्तन झाल्यास क्लीनअप मार्शलच्या ड्रेसच्या मागील बाजूस एक नंबरही दिला जाईल. सध्या या क्लीनअप मार्शलची केवळ पोलीस पडताळणी बाकी आहे. पालिकेनं क्लीनअप मार्शल नियुक्त करण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह पोलीस पडताळणी अनिवार्य केल्यानं सध्या तपासणी सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर आयुक्त रस्त्यावर मार्शल तैनात करण्यास परवानगी देतील.

किती असेल दंड : 'हे' मार्शल सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून 200 ते 1000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल करू शकतात. दंडाची रक्कम तुम्ही केलेल्या कारवाईवर अवलंबून असेल, हा दंड रोखीनं भरला जाणार नाही, तर ऑनलाइन पद्धतीनं भरला जाईल. यासाठी प्रत्येक मार्शलला स्कॅनर देण्यात येणार आहे. परंतु, जर कोणाला दंड रोखीनं भरायचा असेल, तर मार्शल ते देखील स्वीकारण्यास सक्षम असेल. याचा अर्थ तुम्ही केलेल्या चुकीचा दंड तुम्हाला त्याच भरावा लागेल.

क्लीनअप मार्शल आणि विवाद : मुंबईत या आधी देखील क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले होते. कोरोना काळातील या क्लीनअप मार्शलची दादागिरी चर्चेचा विषय ठरली. मास्क नसलेल्यांवर कारवाई करताना क्लीनअप मार्शलकडून अनेकदा नागरिकांकडून पैसे उकळणे, पैशासाठी मारहाण करणे, जादा दंड आकारणे अशा घटना उघडकीस आल्या. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मार्शलच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर पालिकेनं मार्च 2022 पासून कराराचं नूतनीकरण केलेलं नव्हतं. तेव्हापासून मार्शल मुंबईच्या रस्त्यावरून गायब झाले होते.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.