ETV Bharat / state

'बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरे', भूमिपूजनावरुन नाराजी नाट्य

author img

By

Published : Mar 31, 2021, 12:46 PM IST

Updated : Mar 31, 2021, 3:25 PM IST

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज होणार आहे. पण या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना डावलण्यात आले आहे. त्यावरून मनसे आणि भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.

mumbai
मुंबई

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान ही या स्मारकाची नियोजित जागा आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना या सोहळ्यासाठी डावलण्यात आले आहे. त्यावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. यावरून मनसे आणि भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

संदीप देशपांडेची शिवसेनेवर टीका
संदीप देशपांडेची शिवसेनेवर टीका

संदीप देशपांडेंची शिवसेनेवर टीका -

"स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम राजसाहेबच करत आहेत. हीच मराठी माणसाची भावना आहे. तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय? हे महत्वाचं नाही", असे ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. यातून देशपांडेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राजा होण्यासाठी मन मोठं लागतं -
या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही आमंत्रण देण्यात आले नाही. यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत. मनं खूप लहान झाली आहेत!”, असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

नाराजी नाट्यावर शिवसेनेचे स्पष्टीकरण -

या नाराजी नाट्यावर शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थिती हा कार्यक्रम होत आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण -
आज संध्याकाळी 5 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

दोन टप्प्यांमध्ये काम -
महापौर निवासात ठाकरेंचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बाग-बगीचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे केली जातील. तर, दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. स्मारक निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाशी संबंधित मोठी कामे होतील. लेझर शो, डिजिटल मॅपिंग, डिजिटल यंत्रणेच्या मदतीने स्मारकात वेगवेगळ्या टप्प्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीची माहिती देणारी ऑडिओ-व्हिडिओ यंत्रणा उभारण्यात येईल. या कामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. हे स्मारक लवकरच उभे राहणार म्हणून शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सरकारच्या मोठ्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व -

राज्य सरकारच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात किंवा भूमिपूजन कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र गेल्या काही महिन्यात राज्य सरकारकडून विरोधकांना डावलण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. आज होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक भूमिपूजनासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिल्या होत्या. केंद्रशासनाकडेही परवानगीसाठी फडणवीसांनी पाठपुरावा केला होता. शिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे स्मारकासाठी भरीव तरतूद केल्यामुळे फडणवीसांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले होते. मात्र, आज होणाऱ्या या कार्यक्रमाला फडणवीसांच वगळण्यात आले आहे. तसेच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - शस्त्रक्रियेनंतर पवारांनी लगेच वाचले वर्तमानपत्र, वाचा सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये काय सांगितले

हेही वाचा - शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

Last Updated : Mar 31, 2021, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.