ETV Bharat / state

आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री किती? आज होणार निर्णय - बाळासाहेब थोरात - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आज विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 282 सद्स्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत आमदार पदाची शपथ दिली.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 27, 2019, 2:54 PM IST

मुंबई - गेल्या महिनाभरातील सत्तासंघर्षानंतर आता आघाडी सरकार अस्तित्वात येत आहे. मात्र, आघाडीतही मंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा शपथविधीपूर्वी आघाडीचा 1 उपमुख्यमंत्री असेल की 2 उपमुख्यमंत्री असतील याचा निर्णय होणार असल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना ही माहिती दिली.

बाळासाहेब थोरात, विधीमंडळ नेते, काँग्रेस

हेही वाचा - 'नारायण राणे जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते'

दरम्यान, आज विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 282 सद्स्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत आमदार पदाची शपथ दिली. कालिदास कोळंबकर यांना मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे.

हेही वाचा - राज्यपाल कोश्यारींची उलचबांगडी होण्याची शक्यता, कलराज मिश्र होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे, तर नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबरला संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Intro:मुंबई

गेले महिनाभर सत्तासंघर्ष आता आघाडी सरकार अस्तित्वात येत असून आघाडीतही मंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पूर्वी आघाडीचा एक उपमुख्यमंत्री असेल की दोन उपमुख्यमंत्री असतील याचा निर्णय होणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले नवीन आमदारांना शपथ विधी देण्यासाठी विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून अधिवेशनादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी सचिन गडाहिरे यांच्याशी संवाद साधला.Body:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.