ETV Bharat / state

वीज सवलत देण्याची काँग्रेसची भूमिका; वर्षपूर्तीनिमित्त महसूलमंत्री थोरातांची ईटीव्ही भारत सोबत खास मुलाखत - balasaheb thorat mumbai

राज्यातील महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी राज्यात महाविकासआघाडी कडून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आणि सरकारच्या नियोजनबद्ध करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली. वीज सवलतीचा प्रश्नावर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला उत्तर देत त्यांनी काँग्रेसची भूमिका ही सवलत देण्याची असल्याचे सांगत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची पाठराखण केली.

balasaheb-thorat-interview
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 28, 2020, 7:41 AM IST

Updated : Nov 28, 2020, 7:52 AM IST

मुंबई - राज्यातील नागरिकांना 1 ते 100 युनिटपर्यंत वीज सवलत देण्याचे धोरणच काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आम्ही जाहीर केले होते आणि तशी आमची भूमिका आहे. मात्र, या धोरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते गैरसमजातून केले असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस वीज सवलत देण्याच्या बाजूने असल्याचे ही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राज्यातील महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी राज्यात महाविकासआघाडी कडून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आणि सरकारच्या नियोजनबद्ध करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली. वीज सवलतीचा प्रश्नावर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला उत्तर देत त्यांनी काँग्रेसची भूमिका ही सवलत देण्याची असल्याचे सांगत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची पाठराखण केली.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ईटीव्ही भारतवर

सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यशस्वी -
राज्यात कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अडचणीत आलेले असतानाही राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांना सरकारने कधीही उघड्यावर सोडले नाही. उलट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने मागील सरकारच्या काळात लादलेल्या जाचक अटी रद्द करून त्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा केली. शेतकऱ्यावर जेव्हा-जेव्हा नैसर्गिक संकट आले तेव्हा तेव्हा सरकार धावून गेले. कोकणातील निसर्ग वादळ असो अथवा मागील काही महिन्यापूर्वी आलेल्या परतीच्या पावसाचे नुकसान असो. प्रत्येक वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय प्राथमिकतेने सोडवला. त्यामुळे सरकार राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांना दिलासा देण्यासाठी यशस्वी ठरले असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.

सरकार ५ वर्षे कायम राहील -
कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून मदत मिळाली नसतानासुद्धा आम्ही राज्यातील जनतेला मोफत धान्य दिले. शिवाय त्यांच्या उपचारासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा उभ्या केल्या. परप्रांतातील मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी सरकारने आणि विशेषतः आमच्या काँग्रेस पक्षाने आपल्या तिजोरीतील रकमा रिकाम्या करत या मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या. याच काळात लोकांचे रोजगार गेलेले असताना सरकारने त्यांना वेळोवेळी दिलासा देण्याचा प्रयत्न केला.आघाडीतील प्रत्येक मंत्र्यांनी एक समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेतले. यामुळेच वर्षभरातच लोकांचा विश्वास आम्हाला मिळवता आला. वर्षभरातील एकूणच कामकाज आणि सरकारने राबवलेली धोरणे लक्षात घेता आमचे सरकार पुढील पाच वर्ष कायम राहील,असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र सरकारने जीएसटी परतावा दिला नाही -
केंद्र सरकारकडून वेळोवेळी आमची अडवणूक करण्यात आली. आमच्या हक्काचा जीएसटीचा परतावासुद्धा सरकारने दिला नाही. त्यामुळे अनेकदा आम्हाला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अडचणी उभ्या राहिल्या. परंतु आम्ही यासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. राज्यातील शेतकरी जगला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मदतीला महाविकास आघाडी म्हणून धावून आलो, असे थोरात यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेससोबत दुजाभाव नाही -
काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुजाभावाची वागणूक दिली जाते, तसेच त्यांना निधी कमी दिला जातो यावर विचारले असता थोरात म्हणाले की, विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नासाठी सर्वांनाच निधीची गरज असते मात्र कोरोना आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेता काही वेळा असा विषय आला असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच निधीची गरज प्रत्येकालाच असते असे सांगत याविषयी दुजाभाव होत नसल्याचा दावा केला.

दुसऱ्या लाटेपूर्वी काळजी घ्यावी -
राज्यात कोरोनाचे एक संकट जनतेच्या सहकार्यामुळे आपल्याला आटोक्यात आणता आले, मात्र पुन्हा एकदा दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जनतेनी आपल्या राज्याचे हित लक्षात घेऊन त्यासाठीची वेळीच खबरदारी खबरदारी घ्यावी. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हा कार्यक्रम यशस्वी करून पुन्हा एकदा येणाऱ्या संकटासाठी नियम त्यासाठीच्या अटी यांचे पालन करावे, राज्यात पुन्हा हे संकट आपले पाय रोवू शकणार नाही, यासाठीची काळजी घ्यावी असे आवाहन थोरात यांनी या वर्षपूर्तीच्या निमित्ताने केले.

Last Updated : Nov 28, 2020, 7:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.