मुंबई : निरव मोदी आरोपी असलेल्या पीएनबीच्या दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये निरव मोदी आणि इतर नातेवाईक आरोपी पळून गेल्यामुळे सीबीआयने त्यावेळेला धाडसत्र सुरू केले. याप्रकरणी कविता मानकेकर यांना अटक करण्यात आली आहे. बँकर्सने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट येथील ब्रांडी हाऊस या शाखेत बनावट लेटर वापरले आणि एका वर्षाच्या काळासाठी मोत्यांच्या आयातीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट लेटरचा वापर केला. त्यानंतर दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. मात्र कविता मानकेकर यांना अटक केली ती, 20 फेब्रुवारी 2018 रोजी. त्यावेळेला रात्री आठ वाजले होते. आणि आठ वाजेच्या सुमारास महिलेला पुरुष पोलिसांनी अटक करणे हे फौजदारी प्रक्रिया संहिता यातील कलम 46 याचे उल्लंघन होते.
या कारणाने जामीन मिळाला : कायद्याप्रमाणे कोणत्याही महिलेला रात्री पुरुष पोलीस आठ वाजता अटक करू शकत नाही. त्याचे कारण सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना या संदर्भात अटक केली जाणार नाही हा नियम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याच घटनेच्या संदर्भातील याचिकेत मे 2018 मध्ये आदेश दिला होता आणि सीबीआय अधिकाऱ्यांवर महिलेला रात्री पुरुष पोलिसांनी अटक केली. ते कायद्याचे उल्लंघन होते म्हणून पोलिसांना 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता आणि तिला जामीन मंजूर केला होता.
कविता मानकेकर यांच्यावरील आरोप काय? दहा हजार कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा झाला त्यामध्ये ज्वलन मोदी आणि त्याचे इतर नातेवाईक देखील आरोपी आहेत आणि या घोटाळ्यामध्ये तीन आरोपी कंपन्यांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून कविता मानकिकर यांनी स्वाक्षरी केली होती. ती अधिकृत स्वाक्षरी होती ज्यामध्ये लेटर ऑफ अंडरटेकिंग या बनावट पत्रावर स्वाक्षरी केली होती. त्या स्वाक्षरीमुळे कविता मानकीकर या अडचणीत आल्या आहेत. कारण या पत्राच्या आधारेच निरव मोदीच्या कंपन्यांनी प्रचंड इतक्या रकमेचे कर्ज घेतले होते. आणि या यांच्या बनावट पत्रावरील स्वाक्षरी मुळे निरोप मोदी यांना हे कर्ज मिळाले होते त्यामुळे त्यांच्यावर त्यासंबंधीचा आरोप आहे.
कायदेशीर प्रक्रियेचे पालन नाही : यासंदर्भातील वकील राहुल अग्रवाल आणि जस्मिन पुराणिक यांनी आता विशेष सीबीआय न्यायालयाला कथन केले आहे की उच्च न्यायालयाने सीबीआयला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून कविता मानकिकर यांना पुन्हा अटक करण्याची परवानगी दिली आहे. परंतु आजपर्यंत तिला अटक करण्यात आली नाही, की प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहते. या संदर्भातला तपास संपलेला आहे आणि आरोप पत्र अधिक दाखल झाले आहे असे देखील वकील राहू लाग्रवाल यांनी अधोरेखित केले.
न्यायालयाचे निरीक्षण : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस डॉट एम डॉट मेजोगे या नमूद केले, की अर्ज दाखल करण्यास आणि त्यानंतर सीबीआयचे उत्तर येण्यास कालावधी लागला. कविता मानकेकर यांची अटक ही कायदेशीर नाही. आधीच उच्च न्यायालयाने सांगितले होते. तसेच कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करून सीबीआय पुन्हा त्यांना अटक करू शकते. याचे स्वातंत्र्य देखील दिले होते; परंतु आदेश असूनही आजपर्यंत तिला अटक करण्यात आली नाही. मात्र ती नियमितपणे न्यायालयात उपस्थित आहे असे देखील न्यायाधीश मेजोगे यांनी नमूद केले. न्यायाधीशांनी यासंदर्भातली पुष्टी देखील जोडली की, या टप्प्यावर कविता मानकेकर यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यातून काय साध्य होणार आहे. त्यामुळेच अशा प्रकारे कविता मानकेकर यांचा जामीन मंजूर झाला.
हेही वाचा : Thane Crime : बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतील निर्यात कंपनीतून अटक