मुंबई - शहरी नक्षलवाद प्रकरणी वरवरा राव यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 50 हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने राव यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. राव 28 ऑगस्ट 2018 पासून जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा - राज्यातील सुमारे 7 हजार तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण
न्यायमूर्ती एस.एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाले यांच्या खंडपीठाने सांगितले की, सहा महिन्यांनंतर वारवरा राव यांना ट्रायल कोर्टापुढे शरण जावे लागेल किंवा जामीन वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाकडे यावे लागेल. वरवरा राव यांना मुंबईबाहेर न जाण्याचे सांगण्यात आले आहे. राव यांना न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात कोणतेही जाहीर भाष्य देता येणार नाही. जामीन कालावधीत वरवरा राव सह-आरोपींशी कोणताही संपर्क साधू शकत नाही.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या दरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली. वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतीकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगू साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समिक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसमचे (क्रांतिकारक लेखक संघटना) संस्थापक सदस्य देखील आहेत.
हेही वाचा - कोविन अॅपमध्ये बिघाड.. तब्बल साडे सहा तासांच्या विलंबाने हिंदू महासभा रुग्णालयात लसीकरण सुरू