मुंबई - आरे येथून अटक करण्यात आलेल्या 29 निदर्शनकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास अडथळा आणल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. आरेतील वृक्षतोडीला हे तरूण विरोध करत होते.
हेही वाचा - आरेत दुसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे...
आरेत मेट्रो कार शेडसाठी वृक्षतोडीला हायकेर्टाने मंजुरी दिल्यानंतर रात्रीच प्रशासनाकडून झाडे तोडण्यास सुरवात करण्यात आली होती. त्यावेळी परिसरातील शेकडो नागरिक या कृतीचा निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. त्यापैकीच या 29 जणांना पेलिसांनी अटक केली होती.