ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar Yatra: रेल्वेच्या आयआरसीटीसीची 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा', आजच बुकिंग करा - आयआरसीटीसी लिमिटेड

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि बौद्ध वारसाशी निगडित स्थळांचा पर्यटकांना अनुभव देण्यासाठी रेल्वेच्या आयआरसीटीसी लिमिटेडने भारत गौरव टूरिस्ट ट्रेनद्वारे 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. येत्या १४ एप्रिलला यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

Babasaheb Ambedkar Yatra
'बाबासाहेब आंबेडकर यात्रा'
author img

By

Published : Feb 11, 2023, 8:38 PM IST

मुंबई: 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा' ७ रात्र आणि ८ दिवस असणार आहे. त्यासाठी दिल्ली, सफदरजंग, मथुरा तसेच आग्रा येथून प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढता येणार आहे. या ट्रेनमधून दिल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेले मध्यप्रदेश येथील महू, बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दिक्षा घेतली ते नागपूर येथील दीक्षाभूमी, बोधगया हे बौद्ध धर्मातील सर्वांत मोठे धार्मिक स्थळ मानले जाते. सारनाथ या ठिकाणी धर्मशाळा असून बौद्ध तीर्थस्थळ आहे. भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश येथूनच दिला होता. यामुळे दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी येत असतात. भगवान बुद्धांचे कुशीनगर मध्ये महापरिनिर्वाण झाले होते. कुशीनगर जवळ हिरण्यवती नदीजवळ बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला. रामभर स्तूपाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नालंदा येथे सर्वांत मोठे बौद्ध काळात विद्यापीठ होते. या ठिकाणी या यात्रेदरम्यान भेटी देता येणार आहेत.

या ठिकाणी भेटी देता येणार: 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा' ७ रात्र आणि ८ दिवस आहे. यासाठी एकट्या प्रवाशासाठी २९ हजार ४४०, दोन किंवा तीन प्रवासी असल्यास प्रत्येक प्रवाशाला २१ हजार ६५० तर ५ ते ११ प्रवासी असल्यास २० हजार ३८० रुपये इतके तिकट दर असणार आहेत. यात प्रवाशाचे राहणे तसेच नास्ता आणि जेवणाचा समावेश आहे. १४ एप्रिला ही ट्रेन निघाल्यावर त्याच दिवशी मधुरा आणि आग्रा येथून प्रवाशांना घेऊन दुसऱ्या दिवशी १५ एप्रिलला डॉ. आंबेडकर नगर, महू, मध्य प्रदेश येथे पोहचेल. तिसऱ्या दिवशी १६ एप्रिलला ही ट्रेन नागपूर येथे, १७ एप्रिलला सांची येथे, १८ एप्रिलला वाराणसी सारनाथ, १९ एप्रिलला गया, २० एप्रिलला गया राजगिर नालंदा, २१ एप्रिलला आग्रा, २२ एप्रिलला मथुरा, २३ एप्रिलला ट्रेनमध्ये पुन्हा दिल्ली येथे पोहचेल.

बुद्धिस्ट सर्किट : नेपाळमधील लुम्बिनी येथे भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. भारतात भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे एका पिपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली. या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात होते. बोधगया हे बौद्धधर्मातील सर्वांत मोठे धार्मिक स्थळ मानले जाते. सारनाथ या ठिकाणी धर्मशाळा असून बौद्ध तीर्थस्थळ आहे. भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश येथूनच दिला होता. यामुळे दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी येत असतात. भगवान बुद्धांचे कुशीनगरमध्ये महापरिनिर्वाण झाले होते. कुशीनगर जवळ हिरण्यवती नदीजवळ बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला. रामभर स्तूपाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी तसेच इतर बौद्ध धर्मीय पर्यटन स्थळाचा यात समावेश आहे.

काय आहेत आय.आर.सी.टी.सी.चे पॅकेज? : केंद्र सरकारच्या भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीकडून रेल्वेमधील खानपान सेवा, तिकीट विक्री तसेच रेल्वे संबंधित पर्यटन इत्यादी विभाग सांभाळते. या कंपनीकडून देशभरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी विविध २१ पॅकेज देण्यात आहेत. ज्यामध्ये ३२४० रुपयांपासून ८० हजारापर्यंत पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामधील विविध ठिकाणाहून ही पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ट्रेन, विमान, हॉटेलमध्ये राहणे, खाण्याची सोय, इन्शुरन्स आदी सुविधा या पॅकेजमध्ये देण्यात येतात. आयआरसीटीसीच्या पॅकेजमधील चार धाम, बुद्धिस्ट धार्मिक स्थळे तसेच तिरुपती येथे जाण्यासाठी असलेल्या पॅकेजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

हेही वाचा: CM Lunch Farm : शेतामध्ये हातात भाकरी घेऊन मुख्यमंत्र्यांनी केले जेवण; कनेरी मठाला भेट देऊन घेतला लोकोत्सव तयारीचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.