ETV Bharat / state

योग साधनेकडे दुर्लक्ष केल्याने गांधी घराण्याकडे 'राजयोग' नाही, बाबा रामदेवांचा राहुल गांधींना टोला - yog day

गांधी घराण्याने योग साधनेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याकडे सध्या 'राजयोग' नसल्याचे वक्तव्य करत योगगुरू बाबा रामदेव यांनी राहुल गांधीवर टीका केली. गांधी घराण्यातील पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांनी योगाभ्यासाला महत्व दिले होते.

बाबा रामदेवांचा राहुल गांधींना टोला
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:07 PM IST

मुंबई - गांधी घराण्याने योग साधनेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याकडे सध्या 'राजयोग' नसल्याचे वक्तव्य करत योगगुरू बाबा रामदेव यांनी राहुल गांधीवर टीका केली. गांधी घराण्यातील पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांनी योगाभ्यासाला महत्व दिले होते. मात्र, त्यांच्या पुढच्या पिढीने योगाभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याकडे राजयोग राहीला नसल्याचे बाबा रामदेव म्हणाले. यावेळी त्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

येत्या २१ जूनला जगभरात जागतिक योग दिन साजरा होणार आहे. २१ जूनला नांदेड येथील कार्यक्रमात बाबा रामदेव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात क्रीडामंत्री आशिष शेलार आणि बाबा रामदेव यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बाबा रामदेव बोलत होते. यावेळी बाबा रामदेव यांनी योगासनांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

बाबा रामदेव यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले

पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी बाबा रामदेव यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, जागतिक सलोखा राखण्यासाठी योग जगभरात कामी येणार आहे. योग ही एक क्रीडा नसून लोकांच्या जीवन जगण्याचा मार्ग झाला पाहिजे. जगभरात योग स्वीकारला जात असून, त्याचे मूळ भारत आहे याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. २१ जून हा आंतराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून, महाराष्ट्र सरकारही नांदेड मध्ये योग दिन साजरा करणार आहे. ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात योग दिन कार्यक्रम होणार असल्याने ही फार मोठी उपलब्धी आहे.

Intro:गांधी घराण्याने योग्य साधना कडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याकडे सध्या " राजयोग " नाही - बाबा रामदेव

मुंबई १९

गांधी घराण्यातील पंडित नेहरू ,इंदिरा गांधी यांनी योगाभ्यासाला महत्व दिले होते ,मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने योगाभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याकडे " राजयोग " राहिला नाही , राहुल गांधी यांचे नाव न घेता योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्यावर टीका टीका केली आहे . येत्या २१ जूनला जगभरात जागतिक योग्य दिन साजरा होणार असून नांदेड इथल्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात क्रीडामंत्री आशिष शेलार आणि बाबा रामदेव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली .यावेळी बाबा रामदेव यांनी योगासनांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले .

मंत्रालयात पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी बाबारामदेव यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली . पत्रकार परिषदेत बाबा म्हणाले की , जागतिक सलोखा राखण्यासाठी योग जगभरात कामी येणार आहे . योग्य हि एक क्रीडा नसून लोकांच्या जीवन जगण्याचा मार्ग झालं पाहिजे . जगभरात योग्य स्वीकारला जात असून त्याचे मूळ भारत आहे याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे . येत्या २१ जूनला 21 जून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून महाराष्ट्र सरकार ही नांदेड मध्ये योग दिन साजरा करणार आहे . 36 जिल्ह्यातील 3५८ तालुक्यात योग दिन कार्यक्रम होणार असल्याने हि फार मोठी उपलब्धी आहे . या कार्यक्रमात डिड लाख लोक सहभागी होणार असल्याचे क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले .

रामदेव बाबा यांचे राजकीय भाष्य

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योगाभ्यास करत आहेत . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ही योग करतात . त्यामुळे त्यांची आंतरिक शक्ती वाढली आहे .आता विरोधकांनीही योग करावा , की ज्यामुळे त्यांनाही सकारात्मक ऊर्जा मिळून आपली शक्ती वाढवता येईल .

गांधी घराण्यात नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी योगाभ्यास केला होता . त्यामुळे त्यांच्याकडे राज योग्य होता . मात्र आता गांधी घराण्याने योग करणे सोडून दिले आहे . त्यामुळेच त्यांचा राजयोग जुळून आला नाही . Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.