ETV Bharat / state

रेल्वे स्थानकांवर एलईडी स्क्रिनद्वारे कोरोना विषयी जनजागृती

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज, कल्याण आणि अन्य स्थानकावरून इंग्रजी, मराठी भाषेतील कोरोना नियमांची माहिती, कोरोनापासून वाचण्याचे संदेश एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात येत आहेत.

photo
छायाचित्र
author img

By

Published : Mar 29, 2021, 9:39 PM IST

मुंबई - संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ), महाराष्ट्र आणि मध्य रेल्वेच्या भागीदारीत कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रवाशांना मास्क लावा, सामाजिक अंतर राखा, साबणाने हात धुवा, अशी जनजागृतीची माहिती दिली जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज, कल्याण आणि अन्य स्थानकावरून इंग्रजी, मराठी भाषेतील कोरोना नियमांची माहिती, कोरोनापासून वाचण्याचे संदेश एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात येत आहेत.

युनिसेफकडून आव्हान

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना काळात स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. सर्वांनी मास्क घालणे, साबणाने हात धुणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे माहिती युनिसेफ महाराष्ट्राच्या क्षेत्र कार्यालय प्रमुख राजेश्वरी चंद्रसेकर यांनी दिली. सरकारद्वारे कोरोनाच्या लसी देण्याची सुरुवात झाली आहे. जे या लसी घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांना त्वरीत लस देण्यात आहे. कोरोना उपचारांसाठी अधिकाअधिक औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे जर कोणाला बरे नसल्यास रुग्णालयात जा. कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना पाठिंबा द्या, असे आवाहन युनिसेफच्यावतीने करण्यात आले आहे.

डिजिटल स्क्रिन

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण आणि इतर स्थानकात डिजिटल स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रिनवर मास्क, सोशल डिस्टन्स , हात धुणे, हॅन्ड सॅनिटायझर याबाबत मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये संदेश दिले जात आहे. याव्यतिरिक्त रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कोविड नियमांची अंमलबजावणी करण्याचे आव्हानही रेल्वेकडून करण्यात येत आहे. तसेच विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा - हिम्मत असेल तर ठाकरे सरकारने आमच्यावर कारवाई करून दाखवावी - आमदार भातखळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.