ETV Bharat / state

Chief Minister's Instructions : नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी टाळा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

राज्यात नैसर्गिक आपत्ती काळात जीवितहानी टाळण्यासाठी (Avoid loss of life in natural disasters) सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून प्रयत्न करावेत, असे निर्देश (Chief Minister's instructions to the administration) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी दिले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Disaster Management Review
आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
author img

By

Published : Jul 1, 2022, 9:30 PM IST

मुंबई: राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. मुंबईत झालेल्या पावसाने काही भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत 275 मि.मी. पाऊस एका दिवसात झाला. मात्र मुंबई महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई करून पाणी तुंबणार नाही, यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही. वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुक केले.

Disaster Management Review
आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनोज सौनिक, मदत व पुनर्वसनचे प्रभारी अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, गृह विभाग चे प्रधान सचिव संजय सक्सेना, मुंबई महापालिका अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचे महासंचालक अभिषेक त्रिमुखे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, कोस्ट गार्डचे महासंचालक अनुराग कौशिक, नौदलाचे कमांडर कर्नल सुनिल रॉय, वायु सेनेचे ग्रुप कमांडर प्रविणकुमार, मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए.के.लाहोटी, पश्चीम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी.बुटानी, ग्रुप कॅप्टन प्रविण कुमार, एमएमआरडीचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के.एच.गोविंदराज, एनडीआरएफचे कमांडर आशिषकुमार, जलसंपदाचे सहसचिव अतुल कपोले, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.जयंत सरकर, एसडीआरएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकिय संचालक विजय सिंघल, लष्कराचे कर्नल श्रीरंग काळे, नौदलाचे कमांडर परेश कावली यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

हेही वाचा : Heavy Rain In Mumbai : मुंबईत पावसामुळे दाणादाण; पुढील २४ तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.