मुंबई - कोरोना संकटामुळे सर्वच क्षेत्रांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, सर्वाधिक फटका एव्हीएशन क्षेत्राला बसला आहे. बर्याच काळापासून कोरोना संकटामुळे एअरलाइन्सचे कामकाज बंद पडले आणि याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर दिसून येत आहे. या क्षेत्रात जुलैमध्ये प्रवासी संख्येत मोठी घसरण नोंदवली गेली.
जुलैमध्ये एअर ट्रॅव्हल (हवाई प्रवास) 82 टक्क्यांपेक्षा कमी झाला-
यावर्षी जुलैमध्ये एकूण 21.07 लाख प्रवाशांनी देशांतर्गत उड्डाणे घेतली. ही उड्डाणे मागील वर्षाच्या तुलनेत 32.3 टक्के कमी आहेत. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये भारतीय एअरलाइन्सच्या मुख्य पाच विमान कंपन्यांनी केवळ 50 ते 60% एक्यूपेन्सी गाठली आहे.
जूनमध्ये इंडिगोला विक्रमी तोटा-
कोरोनाने विमान वाहतूक, पर्यटन आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील कंपन्यांच्या कमाईला सर्वाधिक नुकसान झाले आहे. जूनच्या तिमाहीत देशातील सर्वाधिक कमाई करणार्या इंडिगो एअरलाइन्सचे 2,844. कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभरापूर्वीच्या नफ्याच्या तुलनेत हे आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान आहे. इंडिगो एअरलाइन्स चालविणार्या इंटरग्लोब एव्हिएशनने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की कोरोनामुळे एअरलाइन्सच्या कामकाजावर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे जूनच्या तिमाहीत त्याचे एकूण उत्पन्न 88 टक्क्यांनी घसरून 1,143.8 कोटी रुपये झाले. हेच उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 9,786.9 कोटी रुपये होते.