ETV Bharat / state

CSMT: सीएसएमटी स्थानकातील शौचालयांमध्ये स्वयंचलित सीट कव्हर

भारतात गेले काही वर्षे स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सीएसएमटी स्थानकातील शौचालयांमध्ये स्वयंचलित सीट कव्हर (Automatic seat covers in toilets) पाहायला मिळत आहेत.

CSMT
सीएसएमटी स्थानकातील शौचालयांमध्ये स्वयंचलित सीट कव्हर
author img

By

Published : Nov 24, 2022, 4:39 PM IST

मुंबई: भारतात गेले काही वर्षे स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या शौचालयांमध्ये वेस्टर्न कमोडला ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ (Automatic seat covers in toilets) ही नवीन संकल्पना राबवली आहे. त्यामुळे रेल्वेचे शौचालय वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सीएसएमटी स्थानकातील शौचालयांमध्ये स्वयंचलित सीट कव्हर

प्रवाशांकडून अस्वच्छता: मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (CSMT stations)ओळख आहे. या ठिकाणी लोकल आणि मेल एक्स्प्रेस चालवल्या जात असल्याने दिवसाला हजारो प्रवाशांची ये जा असते. यापैकी बहुसंख्य प्रवासी सार्वजनिक शौचालयाचा उपयोग करतात. शौचालयांमध्ये जेथे वेस्टर्न कमोडच्या जागा आहेत, बहुतेक लोक लघवी करण्यापूर्वी सीट कव्हर उचलत नाहीत, ज्यामुळे इतर लोकांना ते वापरणे अस्वच्छ वाटते.

यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. सीएसएमटी येथील उपनगरी आणि मेन लाइनवरील सार्वजनिक शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ उपलब्ध करण्यात आले आहेत. हे स्वयंचलित सीट कव्हर अप लवकरच मुंबई विभागातील इतर रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये बसवण्यात येतील अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे संकल्पना? कमोडमध्ये नॉन इलेक्ट्रिक कार्य करणारी स्वयंचलित सीट कव्हर लिफ्ट अप व्यवस्था करण्यात आली आहे. यातील स्प्रिंग ॲक्शन नेहमी त्याचे सीट कव्हर 'लिफ्ट अप पोझिशन' मध्ये म्हणजे वरती ठेवते. जेव्हा त्याचा वापर केवळ शौचालयाच्या उद्देशासाठी करावा लागतो तेव्हा ते सहजपणे खाली ढकलता येऊ शकते. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याचा वापर करत असेल तोपर्यंत ते खाली डाऊन स्थितीत राहील, अन्यथा ते आपोआप वरच्या आणि सामान्य स्थितीत परत येईल. ऑटो लिफ्ट अपसाठी स्प्रिंग, माउंटसाठी ॲल्युमिनियम बेस प्लेट आणि बोल्टची जोडी वापरण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.